पै.मुजीबोद्दिन पटेल हे सर्व समावेशक नेतृत्व होते-कारी रफिक सिराजी

 पै.मुजीबोद्दिन पटेल हे सर्व समावेशक नेतृत्व होते-कारी रफिक सिराजी





    औसा (म. मुस्लिम कबीर)पै.मुजीबोद्दिन पटेल यांनी आपल्या जीवनात समाजाच्या सर्व थरातील लोकांसाठी कार्य केले असून ते सर्व समावेशक व जाणकार नेतृत्व होते असे प्रतिपादन कारी रफिक सिराजी यांनी केले ते दर्गाह हजरत शाह खाकी (रहे) येथील मस्जिद मध्ये माजी नगराध्यक्ष मरहूम अड. मुजीबुद्दिन पटेल यांच्या प्रथम पुण्य स्मरण दीना निमित्त आयोजित श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात बोलत होते.मौलाना अमजद सिद्दीकी यांनी सांगितले की, मरहूम मुजीबुद्दिन पटेल यांनी शहरात सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून प्रत्येक व्यक्तीशी सौजण्या पूर्वक कसे वागावे याचे जिवंत उदाहरण समोर ठेवले आहेत. त्यांनी सांगितले की केवळ माणूस चांगला राहून चालत नाही तर त्याला कृतूत्वा ची जोड असली पाहिजे व नेमका हाच जाबता मरहूम पटेल यांच्या कडे होता. मौलाना हारून इशाती यांनी सांगितले की राजकारणातून समाजकारण कसे साध्य होते याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहेत.त्यांनी मस्जिद आणि मदरशाच्या बांधकामात महत्वाची भूमिका बजावली,विरोधकांसाठीही काम केले,उलामांवर प्रेम केले,सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले, हज करण्यास सर्वांना प्रवर्त करत होते,फजरच्या प्रार्थने दरम्यान मशिदींना भेट देत आणि काळजीने देखरेख करण्यास सांगत असत.काँग्रेस चे शहर अध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले की,मरहूम मुजीबुद्दिन पटेल यांनी शहरात राजकारण करताना समाज हित जपत होते.सर्व जाती धर्माना साथ घेवुन विकास योजना राबविल्या, म्हणुन ते आज शहरातील प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. पत्रकार म. मुस्लिम कबीर यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की शहरात अल्पसंख्यांक समाजातील मुलांना शिक्षण देण्या साठी 1974 सालि संस्था स्थापन केली.या मुळे त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोण समोर येतो.

एम आय एम चे ज्येष्ट नेते मुझफ्फर अली इनामदार यांनी मरहूम मुजीबुद्दिन पटेल यांच्या अनेक पहलू वर विचार मांडले. बजमे उर्दू अदब चे कार्यवाह अवेस अहेमद सिद्दीकी यांनी सांगितले की,मरहूम मुजीबुद्दिन पटेल यांना सांस्कृतिक, शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रा चा ही दांडगा अनुभव होता.पुस्तक वाचनाचं छंद असल्या मुळे ते नेहमी अभ्यासपूर्ण चर्चा करायचे. 

कार्यक्रमाचे संचालन मौलाना फैज अहेमद सिद्दीकी यांनी केले.त्यांनी प्रथम या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मरहूम मुजीबुद्दिन पटेल यांच्या विविध पैलूंचा उल्लेख केला.

कारि रफिक सिरजी यांच्या दुआ नंतर समारोप झाला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या