*माझं लातूर, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकर यांच्याकडून पूरग्रस्त वाहन चालक आणि प्रवाशांना खिचडी, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सोय*
*माझं लातूर, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकर यांच्याकडून पूरग्रस्त वाहन चालक आणि प्रवाशांना खिचडी, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सोय*
मांजरा नदीवरील लातूर - नांदेड रस्त्यावर भातखेडा पुलावर पाणी आल्यामुळे मंगळवारी (ता.२८) रात्री पासून अडकलेेेेल्या प्रवाशी व वाहनचालकांना जेवणाची पंचायत झाली होती त्यामुळे माझं लातूर परिवार, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकरच्या वतीने बुधवारी (ता.२९) खिचडी, केळी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
माझं लातूर परिवाराच्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात माझं लातूरचे अभय मिरजकर, सतिष तांदळे, काशिनाथअप्पा बळवंते, तम्मा पावले, प्रा.डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, विनोद कांबळे, साई फाऊंडेशनचे अनिरुद्ध पाटील, दत्ता करंडे, आकाश कुलकर्णी, समीर पठाण, अमोल मुंढे, राम कारलेवाड, रामेश्वर पाटील यांनी तर आम्ही चाकूरकरचे संगमेश्वर जनगावे, विनोद निला, सदाशिव मोरे पाटील, वर्धमान कांबळे, हाकानी शेख यांच्यासह भातांगळीतील शुभम पडिले, नागनाथ वादकारले यांच्यासह युवकांनी सहकार्य केले. प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी प्रायोगिक तत्वावर पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.