विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण
मोहीम राबवण्याची मागणी.
एस ए काझी
औसा /प्रतिनिधी : - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार,तसेच रा.काँ.चे लातूर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील,लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे, लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख साहेब व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री.प्रशांत कदम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सय्यद मुस्तफा (वकील) इनामदार लातूर शहर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल विहीरे,
यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनसाठी स्वातंत्र लसीकरण मोहिम राबवावी यासाठी केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,च्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष मुन्नाभाऊ तळेकर,युवक उपाध्यक्ष प्रविणसिंह थोरात, सामाजिक न्याय शहर जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्र गायकवाड, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष मुन्ना भाई खान, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष सोहम भाऊ गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष(अभियांत्रिकी विभाग)श्री.बसवेश्वर आप्पा रेकुळगे, जुबेर इनामदार,धीरज सोनवणे,फरहान सिद्दीकी संग्राम पवार, उद्धव आचवले,ज्ञानेश्वर साळुंके,प्रसाद माना, विशाल पाटील,सुरज रंडाळे,आदित्य पाटील,रोहन पाटील, आदी शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.