औसा न्यायालयात मध्यस्थता शिबीर संपन्न

 

औसा न्यायालयात मध्यस्थता शिबीर संपन्न












औसा विधी सेवा समिती व वकील मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थता शिबीराचे दिनांक ०४/०९/२०२१ रोजी दुपारी आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतीमेचे पुजन करुन शिबीरास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औसा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राची आर कुलकर्णी मॅडम हया होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर जाधव हे उपस्थित होते.


सदर शिबिरामध्ये मध्यस्थता संबंधीचे महत्व अॅड. यु.बी. पाटील यांनी सांगीतले तर अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात औसा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राची आर कुलकर्णी मॅडम यांनी मध्यस्थता शिबीराची आवश्यकता व प्रकरणात तडजोड करण्यासाठी वकील, पक्षकार व न्यायाधिश यांच्या कार्यासंबंधीचे सविस्तर असे विवेचन केले व जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणे मध्यस्थामार्फत तडजोड करुन निकाली काढावेत असे आव्हान करुन उपस्थितीतांचे आभार मानून अध्यक्षीय समारोप केला.


या शिबीराचे सुत्र संचालन अॅड. गजेंद्र पी. गिरी यांनी केले. सदरील मध्यस्थता शिबीरास विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापून प्रसिध्द करावी ही विनंती.


अॅड. श्रीधर व्ही. जाधव President


अध्यक्ष Bar Association, Ausa


विधिज्ञ मंडळ, औसा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या