*उस्मानाबाद बसस्थानकात बेवारस वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला*
दि. 5 - उस्मानाबाद -
उस्मानाबाद येथील बसस्थानकात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी आनंद नगर पोलीस दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद बसस्थानकातील बंद असलेल्या रसवंती शेजारील फलाट क्रमांक ३ वर वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आज दुपारी चार वा. च्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर याची खबर स्थानक प्रशासनाने पोलिसांना दिली. या महिलेचे वय अंदाजे ७५ असून चार पाच दिवसांपूर्वी त्याना कोणी तरी सोडून गेले असल्याचे नेहमी प्रवास करणारे प्रवासी सांगतात. मृतदेहाजवळ कोणतीही पिशवी अथवा साहित्य आढळून न आल्याने ओळख पटवणे अवघड आहे. आनंद नगरचे सपोनि तुकाराम शिंदे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. रुग्णवाहिकेतून मृतदेह शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी नेला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.