लातूर रिपोर्टर न्यूज़ बीयूरो
*स्मॉल फायनान्स बँकच्या वसुली अधिकाऱ्याला लुटणारे अज्ञात आरोपींचा शोध घेऊन दोनच दिवसात अटक.... पोलीस ठाणे शिरूरअनंतपाळ च्या पोलिसांची कामगिरी*
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,फिर्यादी खाजा मैनोदीन मुजावर (जना स्मॉल फायनान्स बँक, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर) यांनी दिनांक 02/09/2021 रोजी पोलीस ठाणेला फिर्याद दिली की, "मी जना स्मॉल फायनान्स बँक मध्ये काम करत असून आमची बँक लहान स्वरूपाचे कर्ज वाटप करते व दिलेल्या कर्जाची रक्कम दर महिन्याला कर्जदाराच्या गावात जाऊन वसुली केली जाते.
दिनांक 02/09/2021 रोजी आमचे बँकेमार्फत कर्ज ग्राहकाकडे कर्जाचे हप्ते वसुलीसाठी नेहमीप्रमाणे शेंद या गावी गेलो होतो. गावातून कर्जदाराचे पैसे घेऊन लातूर कडे निघालो असता संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तळेगावपाटी चे पुढे आल्यावर माझ्या पाठीमागून आलेल्या अनोळखी ट्रिपलसीट मोटरसायकल स्वारा ने माझ्या मोटरसायकलला पायाने धक्का देऊन मला खाली पाडले. मी खाली पडताच मोटरसायकल वरील अज्ञात तीन इसमांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आधीच कर्जदारा कडून वसुली केलेली रक्कम 1,26,530 रुपये,सॅमसंग कंपनीचा टॅब व मशीन असा एकूण 1,38,530 रुपयांचा मुद्देमाल असलेली माझी बॅग जबरीने घेऊन पळून गेले आहेत अशी तक्रार दिली.
त्यावरून पोलीस ठाणे शिरूरआनंतपाळ येथे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/2021 कलम 394, 34. भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी अहमदपूर श्री.बलराज लजिले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री.सुडके यांच्याकडे देण्यात आला. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला जात होता.दरम्यान गोपनीय माहिती वरून हालगी या गावातील 02 तरुणांना दिनांक 04/09/2021 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हालकी गावातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांचे नाव
1) बंडू माधव सूर्यवंशी, वय 34 वर्ष, राहणार हलकी.तालुका शिरूर आनंतपाळ
2) विक्रम राजेंद्र सूर्यवंशी,वय 22 वर्ष, राहणार हलकी. तालुका शिरूर आनंतपाळ
असे असून नमूद तरुणांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून नमूद आरोपींना आज रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना 09/09/2021 पर्यंतची PCR दिलेली आहे.
गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीचा व चोरीस गेलेल्या रक्कमेचा शोध व तपास सुरू असून गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीस लवकरच अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सुडके हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.