वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील भजनी मंडळातील वृद्ध कलावंत हे मागील अनेक दिवसापासून भजन, कीर्तन, प्रवचन तसेच तबला व हार्मोनियम वादनाच्या माध्यमातून धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्य करतात.तालुक्यातील वृद्ध कलावंतांनी सांप्रदायिक दिंड्या आळंदी ते पंढरपूर पायी यात्रेतून प्रबोधनाचा जागर करीत परंपरा टिकून ठेवली आहे.कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देऊन वृद्ध कलावंत साहित्यिक योजनेतून तालुक्यातील कलावंतांना मानधन सुरू करावे अशी मागणी दैवशाला केवळराम तालुकाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद औसा यांनी तहसीलदार शोभा पुजारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर रमाकांत भोसले,रंजना खुरपे,सारिका पवार,संगीता जवळगे, मुद्रिका वाघमारे भारतबाई मोरे,गौरी खुरपे, दगडू मुगळे मोहन गायकवाड,राजशेखर केवलराम यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.