*जखमी हरणाला वन्यजीवप्रेमी कडून जीवदान*
औसा प्रतिनिधी:-
औसा तालुक्यातील तपसेचिंचोली शेतशिवारात जखमी आणि घाबरलेल्या अवस्थेत पडून असलेल्या हरणाच्या पाडसाला तपसेचिंचोली येथील वन्यजीवप्रेमी तरुणांनी वनविभागाकडे सुपूर्द करून जीवनदान दिले आहे. तपसेचिंचोली - गोटेवाडी रस्त्याच्या बाजूला एक हरणाचे पिल्लू जखमी आणि घाबरलेल्या अवस्थेत पडून असल्याचे अमोल नेटके,शंकर कांबळे, प्रदीप नेटके ,प्रवीण कांबळे , या युवकांना दिसले.
ही माहिती महाराष्ट्र शासन वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईनला संपर्क साधून प्रशांत नेटके यांनी लातुर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार या हरणाच्या पिल्लाला तरुणांनी वनविभागाचे कर्मचारी राहुल शिंदे यांच्याकडे दिले . लामजना या ठिकाणी त्या हरणावर लामजना येथे प्राथमिक उपचार करून त्याला खरोसा येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी प्रशांत नेटके,राहुल शिंदे , दिलीप नेटके ,मारुती नेटके उपस्थित होते.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी इतर कोणत्याही संकटकाळात वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईनला शेतकऱ्यांनी माहिती कळवावी जेणेकरून अडचणीत असलेल्या वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी मदत होईल अशी माहिती यावेळी वनकर्मचारी राहुल शिंदे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.