राष्ट्रीय अभियंता दिनी ऑनलाईन लाईव्ह चर्चासत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
दि १५ (लातूर प्रतिनिधी)
भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रीय अभियंता दिनी लातुर येथे ऑनलाईन लाईव्ह संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.
पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, लातूर महाऊर्जा विभागीय कार्यालय व व्हीडीएफ स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी लातूर यांच्यावतीने संयुक्तपणे ऑनलाईन लाईव्ह आयोजित करण्यात आले. मुख्य अतिथि लातूर विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक डी.व्ही. कुलकर्णी व पीसीआरए पुणे सहसंचालक स्वातीकुमारी मॅडम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.वी.बुके होते. महाव्यवस्थापक डी.व्ही. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासन ऊर्जा मंत्रालय यांच्या ऊर्जा संवर्धन करिता विविध योजना विषयी विस्तारित माहिती दिली.
प्रास्ताविक डॉ. एम.वी.बुके यांनी केले. पीसीआरए चे फैकल्टी केदार खमितकर ऊर्जा लेखापरीक्षणावरती मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संभाजी भोसले यांनी केले. वी.डी.एफ. इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राध्यापक स्टाफ, विद्यार्थी, विद्यार्थींनी इंजिनिर्स डे कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रथम सत्र विषय: 'ऊर्जा कुशल भारत में इंजीनियर की भूमिका' :'आत्मनिर्भर भारत की निर्माण कार्य में अभियंताओं का योगदान - विषय चर्चा सत्रात होते. द्वितीय सत्रात प्रश्नोत्तरी सवाल जबाब ठेवण्यात आला होता.ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आणि कोऑर्डिनेशन अभियंता किरण खमितकर यांनी वरदानी भवन लातूर येथून यशस्वीपणे केले. कार्यक्रमात सर्व प्रथम अभियंता दिनानिमित्त एम. विश्वेश्वरय्या सर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्र उभारण्याच्या बाबतीत आमच्या अभियंत्यांच्या योगदानाचा भारताला अभिमान आहे असे पीसीआरए पुणे सहसंचालक स्वातीकुमारी मॅडम यावेळी कार्यक्रमात मत व्यक्त केले आणि सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.