जमदाडे विचारमंचचे राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान
*******
*******
लातूर - कै.अॅड.देविदासराव जमदाडे प्रबोधन आणि विचारमंचाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालय,क्रिडा संकुल, लातूर याठिकाणी संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते अॅड. मनोहरराव गोमारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व वक्ते डॉ.राजशेखर सोलापुरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की, राज्यकर्त्यांच्या कार्यनिष्ठेवर नव्हे तर शिक्षकांच्या कार्यनिष्ठेवर राष्ट्र निर्माण होत असते. शिक्षक हा काळ निर्माण करतो त्यामुळे त्याची कार्यनिष्ठा ही प्रत्येक कालखंडात महत्वपूर्ण असते. शिक्षकाने आपली सज्जनता अबाधित ठेवली पाहिजे. शिक्षक हा केवळ वर्गापुरता मर्यादित न राहता तो लोकशिक्षक झाला पाहिजे. आपल्या भोवतालची माणसे मोठी करणे हाच समाज बांधणीचा उचित मार्ग आहे. शिक्षकाला पगारजीवी या साच्यातून बाहेर पडावे लागेल आणि पिढ्यांना शिकविण्यासोबतच जगविण्याचा ही वसा घ्यावा लागेल.
अध्यक्षीय मनोगतात मनोहरराव गोमारे म्हणाले की, मी कै. अॅड.देविदासराव जमदाडे यांचा विद्यार्थी असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी घडू शकलो.भौतिक सुखाच्या पाठीमागे शिक्षकांनी खूप न लागता आपले कर्तव्य केले पाहिजे तरच चांगला समाज आपल्याला निर्माण करता येईल.
कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार यावेळी प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, डॉ. सतीश यादव,डॉ.प्रशांत विघे, डॉ. नारायण कांबळे, प्रा. डॉ.जयद्रथ जाधव, प्रा. डॉ. दुष्यंत कठारे, डॉ. उमाकांत जाधव, प्रा. डॉ. संजय गवई, प्रा.बस्वराज करकेली, प्रा. मनीषा शिंदे, गणेश सावळकर, डॉ. वीरभद्र दंडे, प्रा. नयन भादुले - राजमाने, प्रा. डॉ.नवनाथ सिंगापूरे, गुरुदत्त पुरी आदींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय जमदाडे यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश घादगीने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज जमदाडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब लोमटे, गणेश मोरे, सुनिल पुरी, डॉ. एस. एस,.कुलकर्णी,सौ.सुरेखा जमदाडे आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.