इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी
प्रफुल्ल कांबळेच्या प्रयोगाची निवडलातूर दि.14/09/2021
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू झाले असून यामध्ये जेएसपीएमद्वारा संचलित स्वामी विवेकांनद विद्यालय एमआयडीसी येथील इयत्ता 9 चा विद्यार्थी प्रफुल्ल प्रकाश कांबळे याने प्रकाशाचा सापळा हा प्रयोग या ऑनलाईन प्रदर्शनात सादर केला असून या प्रयोगामुळे पिकावरील किड नियंत्रण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या प्रयोगाची निवड इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2020-21 साठी झालेली आहे. या कामी त्याला प्राचार्य गोविंद शिंदे, उपमुख्यध्यापक प्रभाकर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव, इस्टेट प्रमुख चंद्रशेखर पाटील, प्राचार्य गोविंद शिंदे, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्याचे कौतुक केले.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.