अंधमुक्त ग्राम संकल्पने अंतर्गत औसा येथे डोळ्याचे शिबीर

 अंधमुक्त ग्राम संकल्पने अंतर्गत औसा येथे डोळ्याचे शिबीर






 औसा प्रतिनिधी

 लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर आणि आई ऑप्टिकल्स औसा यांच्या संयुक्त विद्यमाने अंधमुक्त ग्राम संकल्प योजनेअंतर्गत औसा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 3 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. पवार कॉम्प्लेक्स, आई ऑप्टिकल्स मेन रोड औसा येथे सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत या शिबिरामध्ये नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. वयोमानानुसार येणारे  मोतीबिंदू ,एक फूट अंतरावरून हाताची बोटे मोजता न येणे, अस्पष्ट धूसर दिसणे,  या बाबीवर उपचार करण्यात येणार आहे .तसेच कृत्रिम भिंगारोपण  करणे, फेको द्वारे मोतीबिंदू व उच्च दर्जाचे लेन्स बसविण्याची व्यवस्था लायन्स नेत्र रुग्णालयाच्या  वतीने करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10  गावे लातूर जिल्ह्यात अंधमुक्त झाली आहेत . ऑपरेशन साठी निवड झालेल्या नेत्र रुग्णांना येण्या-जाण्याचा प्रवास मोफत असून माफक दरात चष्मे देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या