तीन अल्पवयीन बालिकांचा पालक म्हणून सोंग घेऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

 

तीन अल्पवयीन बालिकांचा पालक म्हणून सोंग घेऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा








 लातूर- येथील जिल्हा न्यायालयात आरोपी चंद्रकांत नामदेव वाघलगावे याने पिडितांच्या आईसोबत तिच्या संमतीने पती म्हणुन राहत असताना मे 2007 ते ऑक्टोंबर 2017 या काळात वांरवांर संधी मिळेल त्यावेळी पिडीत मुलींना धमकी, मारहाण करून जबरी संभोग केला. कलम 376 (2)(एन),323,506,भा.द.वी. 4,6,8,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे सदरील आरोपाखाली विशेष (पोक्सो) न्यायालयाचे न्यायाधीश श्री.बी.सी.कांबळे यांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व 1000/- रू दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणी गांधी चौक पो.स्टे. या ठिकाणी पिडीत बालीकेच्या तक्रारीवरून गु.क्रं.524/2017 नोंद करण्यात आला होता. सदरील गुन्हयाचा तपास म.पो.उ.नि.एस.एस.पिंपळखेडे यांनी करून आरोपीविरूध्द दोषारोप दाखल केले होते. आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्याकरिता सरकारपक्षाने एकुन 9 साक्षीदारांचा तोंडी पुरावा नोंदविला होता. यामध्ये तिन्ही पिडित बालिकेचा पुरावा महत्वाचा ठरला. इतर साक्षीदारमध्ये पिडीतेची आई , पिडीतीचे वय सिद्ध करणारे मुख्याध्यापक आणि पिडीतेवर वैदयकीय उपचारावरून अहवाल देणार्‍या वैदयकिय अधिकार्‍याचाही पुरावा महत्वाचा ठरला.
 सरकारपक्षाच्या वतीने प्रकरण सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री.एस.एस.रांदड व विशेष सरकारी अभियोेक्ता अ‍ॅॅड.मंगेश एस.महिंद्रकर यांनी कामकाज पाहीले. त्यांनाअ‍ॅड. विदया पी वीर व अ‍ॅॅड.अंकीता धुत यांंनी सहकार्य केलेे. महिला पोलीस शिपाई सुमन हाळे व महिला पोलीस नाईक एस.के.जाने यांनी कोर्टाची पैरवी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या