साखर कारखान्याची कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या आरोपीता पैकी एक आरोपीस अटक. पोलीस ठाणे मुरुड ची कारवाई.
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार अशोक तोडकर (विधी सहायक,विलास सहकारी साखर कारखाना,निवळी) राहणार-सुशिलादेवी देशमुख नगर, लातूर. यांनी पोलीस ठाणे मुरुड येथे फिर्याद दिली की, भारत सरकार च्या धोरणा प्रमाणे प्रत्येक साखर कारखान्यास त्यांनी उत्पादित केलेल्या साखरे मधून काही साखर निर्यात करणे बंधनकारक आहे.त्याप्रमाणे भारत सरकार कडून मिळालेल्या कोट्यातील कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरे पैकी 8364 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,चेन्नई याचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख,राहणार-अहमदनगर यांचे मार्फत 8364 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी कंपनीसोबत करार करण्यात आला होता.
त्याप्रमाणे सदर कंपनीने 8364 मेट्रिक टन साखर कारखान्यामधून साखर निर्यात करण्यासाठी घेऊन गेले. साखर घेऊन गेले पासून 90 दिवसाचेआत सदरची साखर निर्यात केल्या बाबतचे कागदोपत्री पुरावे सादर करणे आवश्यक असताना सदरचे कागदपत्र साखर कारखान्यास दिलेले नाही.कारखाना प्रशासनाने वेळोवेळी सदर कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली तेव्हा सदरचे कागदपत्रे देण्यास कंपनीने टाळाटाळ केले.त्यामुळे साखर कारखान्याचे 8 कोटी 73 लाख 87 हजार 72 रुपयाचे नुकसान झाले.
सदर कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीपराज, चेअरमन मदिगा मनिकांत उर्फ मनीकृष्णा तसेच कंपनीचे संचालक प्रदीप राज गायत्री व कंपनी चे प्रतिनिधी अभिजीत देशमुख, राहणार अहमदनगर व सदर कंपनीचे इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्या कडून निर्यातीची साखर कमी दरात खरेदी करून साखर निर्यात करतो असे भासवून स्थानिक बाजारात त्या साखरेची चढ्या भावाने विक्री करून विश्वासघात केला व कारखान्याचा 8 कोटी 73 लाख 87 हजार 72 रुपयाचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली. वगैरे मजकुराची तक्रार दिल्याने सदर तक्रार वरून पोलीस ठाणे मुरुड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2021, कलम 420 ,406, 467, 34. भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात मुरुड पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.ढोणे करीत आहेत.
सदर गुन्ह्याच्या तपासात नमूद कंपनी कुरीज प्रोनॅचरल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी अभिजीत वसंतराव देशमुख,राहणार -अहमदनगर यास दिनांक 01/09/2021 रोजी तपासकामी अटक करण्यात आली असून आज रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी आणि फसवणूक करून नमूद आरोपीतानी मिळवलेली रक्कमे बाबत पुढील तपास सुरू आहे
*नमूद गुन्ह्यातील अटक आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने सदर अटक आरोपीस 06/09/2021 पर्यंत ची PCR दिली आहे.*.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.