*बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक ; उस्मानाबाद जिल्ह्यात एकास अटक*
दि. 15 - उस्मानाबाद -
आयसीआयसीआय बँकेमध्ये ६३ तोळे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथून पोलिसांनी मंगळवारी ( दि .१४ ) एकास अटक केली याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली असून अद्यापपर्यंत ३ जणांना अटक केली आहे .
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , तुळजापूर येथील आयसीआयसीआय बँकेत ६३ तोळे बनावट सोने तारण ठेवून १७ लाख ७० हजार ८५१ रुपयाची फसवणूक केल्याची घटना चव्हाट्यावर आली होती . याप्रकरणी शाखाधिकारी सुनिल क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता . पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन , अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे , उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख , पोलीस निरीक्षक काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे , पोहेकॉ सोनवणे , पोना यादव , पोकॉ सावरे पोकॉ साळुके पोकॉ ससाणे , पोकॉ पवार यांच्या पथकाने मोहोळ येथून अब्बास राजु पठाण यास मंगळवारी इटकळ येथून अटक केली . याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सददाम शेख व कोंडाजी हारुण खुदादे ( रा.इटकळ ) यांना अटक केली आहे . आरोपीकडून अद्यापपर्यंत एकूण ४ लाख ५६ हजार ६१६ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत .
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.