वाढदिवस विशेष-राजू पाटील कैक पटांगणांचा व्यास असलेल्या ‘रिंगण’चे रिंगणकार...*

 *वाढदिवस विशेष-राजू पाटील कैक पटांगणांचा व्यास असलेल्या ‘रिंगण’चे रिंगणकार...*




राजू पाटील,वृत्तपत्रातील दुनियेत सिर्फ नाम ही काफी है. वृत्तपत्रातील पितामाह,उत्कृष्ठ वक्ते, विचारवंत, निर्भिड, सडेतोड,रोखठोक लेखनीचे बादशाह म्हणजेच आदरणीय आचार्य राजू पाटील साहेब. दैनिक मनोगतच्या यशशिखरावर आपल्या लेखनीतून असंख्य वाचक वर्ग निर्माण करणार्‍या संपादक राजू पाटील साहेबांचं रिंगण हे सदर वाचकासाठी पर्वणीच असतो.सरांचा आज वाढदिवस,सरांच्या खडतर व यशस्वी प्रवासास हार्दिक शुभेच्छा तसेच रिंगणकार, वास्तववादी विचारवंत,उत्कृष्ठ लेखक तथा समीक्षक आदरणीय आचार्य राजू पाटील साहेबांचे मनस्वी अभिनंदन.अखेर राजू पाटील साहेबांची वैचारिक क्षमता,बुध्दीचातुर्य आणि लेखन गुण या अवलोकनीय बाजू आहेत.आपल्याला माहीत आहे की,माणूस हा विचारांनी घडतो आणि जो माणूस विचारपुर्वक बोलतो,वागतो,लिहतो व आमलात आणतो याचाच प्रत्यय म्हणजे राजू पाटील होय.त्यांच्या विषयी,त्यांच्या लेखन शैली विषयी तसेच त्यांच्या वक्तृत्व विषयी लिहणं म्हणजे रिंगणाच्या गळात सुध्दा बसण्यासारखे माझे शब्द नाहीत आणि मी राजू पाटील या अवलीयाची लिखानाच्या बाबतीत कधीच बरोबरी करु शकत नाही.

राजू पाटीलांच्या रिंगणात सकारात्मक विचार आणि नकारात्मक बाबीवर विश्‍लेषण हमखास असते.रिंगणला पटांगणात कसं घ्यायचं आणि वाचणार्‍यांना लोटांगण कसं घ्यायला लावायचं हे राजू पाटलांन शिवाय कोणीच करु शकत नाही.कारण त्यांचा बौध्दीक ज्ञानभंडार, क्षितीजापलिकडील वैचारिक क्षमता आणि मुद्येसुद प्रश्‍नांची खलबत हया जमेच्या बाजू असून त्यांनी स्वत:ला तसं घडविलेलं आहे.अपार मेहनत घेतलेली आहे.कारण लिखान करणं हे प्रत्येकाला जमत नाही.त्यासाठी अखंड वाचन,मनन,चिंतन आणि आचरण हया बाबी नेहमी आमलात आणाव्या लागतात आणि हेच संपूर्ण गुण राजू पाटील या मिश्रणात आहेत.एखादं वृत्तपत्र चालविणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.वृत्तपत्र चालविताना विविध अडचणीचा सामना करावा लागतो हि सत्यता माहित असून सुध्दा पाटील साहेबांनी न डगमगता,न भिता,संयमाने आणि अखंड परीश्रमाने दै.मनोगतला शिखरावर नेहून पोहचविलं आहे आणि त्यांना हे शिखर सर करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय तिप्पणप्पा(दादा) राचट्टे यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे.  

वास्तविक रिंगणातील शब्द कांही असे असतात की वाचणार्‍याच्या कपाळावर पडणार्‍या आठया हे सांगून जातात की यांना हे पटलं नाही किंवा विचार करण्यास भाग पाडतात की कांहीतरी न पटणारं आहे. तसेच राजू पाटील या रसायनात वैयक्तिक राग,ईर्ष्या,जात,धर्म या गोष्टींना थारा नाही.ते सर्वांसोबत ऋणानूबंधनाने वागतेत,समजून घेतात आणि मैत्रीपुर्ण संबंध जपतात हे खास वैशिष्ठय मी जवळून पाहिलेलं आहे. तसेच सर्वच भाव-भावनांना एकत्र बांधून जिवनाच्या या सुंदर अशा वाटेवरती मित्राचे,आपुलकीचे तथा सांघिक भावनेचे नाते मात्र सदा-सर्वदा अबाधित टिकविण्याचं मोलाचं कार्य सरांनी मनोगतच्या माध्यमातून केलेलं आहे.मागील दोन वर्षापूर्वी औसेकरांच्या वतीने माकणीच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारलं गेलं होतं.या ज्वलंत विषयावर माकणी पाणी पूरवठा योजनेस मान्यता मिळावी म्हणून सतत,अविरत,दैनंदीन आठवडा भर पाणीप्रश्‍नावर रिंगणातून दखल घेवून औसेकरांच्या सामुदायिक मागणीला यश मिळवून देण्यासाठी राजू पाटील सरांनी अविरत लढा रिंगणच्या माध्यमातून दिला आणि सरकारला दखल घेण्यायोग्य लिखाण करुन पाणीप्रश्‍नावर तोडगा काढायला भाग पाडलं. तसेच रिंगण या सदरातून नेहमी नागरी समस्याची जाण ठेवून,त्यावर विचारपूर्वक लक्ष वेधून घेण्यासारखं लिखान आदरणीय पाटील साहेबांनी केलेलं आहे व करीत आहेत.राजू पाटील साहेबांनी रिंगणातून दररोज विविध विषय जनतेसमोर आणून सत्यता पडताळण्यास भाग पाडलं आहे.त्यात जिभ उचलून टाळूला लावणे सोपे असते,आयुष्यभर झिजणं,राज्य उभा करणं अवघड असत,पालकमंत्री अचानक पीए साहेबांचे नेते कसे झाले,औशाचे नगराध्यक्ष माळावर बसून बासरी वाजवतात आणि शहर डोक्यावर हात मारुन घेत बसते,कसे?का?, लोक आपला प्रतिनिधी केंव्हा आणि का बदलतात,अशा अनेक प्रश्‍नांना सकारात्मक बाबीने खूलासा करुन जनतेसमोर सत्य मांडायचं प्रामाणिक प्रयत्न पाटील साहेबांनी केलं आहे.मग अशी शब्दाची जादू,वैचारिक भाषा अन्य कोणाला जमणार का? शेवटी उत्तर आहे नाही.मग या शब्दरुपी जंजालातून एकच नाव पूढं येतं ते म्हणजे राजू पाटील कारण रिंगणात आज काय वाचायला मिळणार हे आतूरतेने वाट पाहणार्‍या वाचकाकडे बघीतलं तर रिंगणांच महत्त्व आणि त्याला शब्दरुपी जादू निर्माण करणार्‍या आदरणीय राजू पाटील साहेबांनी पत्रकारीता क्षेत्रात मिळविलेली उंची व यश दिसतं.म्हणून तर शेवटी एवढंच म्हणतो की,रिंगण हजारो वाचकांचा खमक्या विश्वास असून राजू पाटील हे एक रिंगणातील मनोगत आहेत.शेवटी या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व संपादक राजू पाटील सरांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि दूवा करतो की,सरांना उदंड आयुष्य लाभो..... *ऍड.इकबाल शेख/औसा.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या