भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्ह्याची बैठक सम्पन्न
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जनतेचे कार्य करा....
मा आ सुधाकर भालेराव यांचा कार्यकर्त्याना कानमंत्र......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला सलग दोन वेळेस
मिळालेले यश ..... केंद्र सरकारने केलेले विकासाचे कार्य ,व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात भाजप पक्ष मजबुतीने संघटन वाढिसाठी आपले कार्य करत असून भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा आ सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आज अनुसूचित जाती मोर्चा हा गाव, वाढी, तांडा वस्ती ,शहरा पर्यंत मजबुतीने जनते पर्यंत पोहोचत आहे,मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांचे लक्ष आहे""अंत्योदय"" .... शेवटच्या घटकातील गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचून कार्य करणे, या विनंतीस मान देऊन गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी यांची
दि 11 सप्टेंबर 2021 रोजी ,भाजपा अनुसूचित जाति मोर्चाची बैठक संपन्न झाली. बैठकीत अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष जे. डी. जगणीत यांचा तालुका निहाय दौरा कार्यक्रम ठरविण्यात आला, दिनांक 18 सप्टेंबर. ते 26 सप्टेंबर 2021 पर्यंत
जिल्हा कार्यकारणी चा प्रवास ठरविण्यात आला. बैठकीला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय केशवजी मानकर, जिल्हा संघटन संपर्कप्रमुख बाळाभाऊ अंजनकर, जिल्हा संघटन महामंत्री संजय रावजी कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगणित गुरुजी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शीलाताई चव्हाण, मोर्चाचे जिल्हा महामंत्री अजित मेश्राम, उत्तमराव नंदेश्वर, मीनाताई शहरे, किरण ताई कांबळे, रूपालीताई तेंभूर्णीकर, गोंदिया शहराध्यक्ष मिलिंद बागडे, गोंदिया ग्रामीण अध्यक्ष गणवीर जी, सालेकसा तालुका अध्यक्ष वालदे जी आणि मोर्चा चे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.