ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल मध्ये दहिहांडी उत्साहात साजरी
आज ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल मध्ये गोकुळ अष्टमिचे औचित्य साधून आज दहिहांडीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका कृष्णभक्त सौ. संजीवनी बिरादार मॅडम , तसेच सौ. संगीता जाधव मॅडम या उपस्थित होत्या . प्रमुख पाहुण्याच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलनांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . शाळेतील शिक्षीकाणी कृष्ण पाळणा म्हणून कार्यक्रमाला औपचारीक रित्या सुरुवात केली . शाळेत उपस्थित मोजक्या मुलांनी कृष्ण – राधा वेशधारना करून कृष्णाच्या गोष्टी सर्वांशी शेअर केल्या . अध्यक्ष्य भाषणात सौ.संजीवनी बिरादार मॅडमनी सांगताना ज्या प्रमाणे कृष्ण त्याच्या गोपी एकत्र येऊन आपली न्ह्यारी जेवण एकत्र करून ते सर्वांसोबत मिळून मिसळून जेवत असत त्याप्रमाणे आपण ही सगळ्यांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे परंतु या कोरोंना काळात आपण सोशल डिस्टन्सचे पालन करून पण मनांनी एकत्र येऊन हा सन साजरा करू या अशे मत मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्या सोळुंके मॅडम यांनी केले , तर आभार प्रदर्शन सगरे रामेश्वर सर यांनी केले , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले . या नंतर मुलांनी दहिहांडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.