लोकसहभागातून उभारलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन

 

लोकसहभागातून उभारलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन





लातूर ः शिवाजी नगर पोलीस स्टेशनअंतर्गत जुना औसा रोडवर (ड्रायव्हर कॉलनी) येथे लोकसहभागातून पोलीस चौकीचे उद्घाटन बांधकाम व्यवसायिक अमोल मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्विकृत नगरसेवक पुनीत पाटील, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पुजारी, पोलीस उपनिरीक्षक संतोष औंढकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती मेतलवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब मस्के, जगन्नाथ हाडबे, विश्‍वनाथ गिरी, मंगेश डोंगरे, तुकाराम माने, रमेश कांबळे तर जुना औसा रोड भागातील रहिवासी माने, जाधव, महादेव पोलदासे आदिंची उपस्थिती होती.
गेल्या कांही महिन्यांपासून जुना औसा रोड भागात कांही अनुचित घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या भागातील नागरिकांनी जुना औसा रोड भागात पोलीसांची नियमीत गस्त गरजेची असल्याचे पोलीस निरीक्षक निखील पिंगळे यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पोलीस चौकी उभी करण्याचे आश्‍वासन दिले होते. या पोलीस चौकीचे संपूर्ण बांधकाम येथील बांधकाम व्यवसायिक अमोल मुळे यांनी स्वःखर्चातून केले आहे. या पोलीस चौकीमुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या