कर्तत्ववान महिलांचा सन्मान;
भादेकर माहेरवासीन डॉ स्वाती शेळके-पाटील यांनी योगाभ्यासाद्वारे महिलांच्या सुदृढ आरोग्याचा केला संकल्प
औसा-कर्तत्ववान महिलांचा सन्मान;म्हणून भादा
भादेकर माहेरवासीन डॉ स्वाती शेळके-पाटील यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
केवळ महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर बोलले जाते परंतु सबंध महिलावर्गाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाकडे कुटुंबाचेही आणि समाजाचेही दुर्लक्ष होताना दिसते.त्यामुळेच डॉ स्वाती संजय शेळके- पाटील यांनी महिलांच्या आरोग्यदायी जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे.त्यांनी योगा अभ्यासाद्वारे महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावे असा सल्ला दिला आहे.
जीवन रेखा कॉलेज प्रतिष्ठानमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.सध्या त्या पाच वर्षापासून लातूर शहरात योगाचे वर्ग घेत आहेत. वजन कमी करणे,वाढविणे आणि त्वचा निरोगी राहणारा योगाभ्यास त्या करून घेतात मनाची सुंदरता आणि सर्वोत्कृष्ट असे असते त्याचबरोबर स्वतःचे व्यक्तिमत्व उजळून निघावे.कुठलाही न्यूनगंड राहू नये.यासाठी त्या महिलांना मार्गदर्शन करतात.वाढलेले वजन ही मोठी समस्या आहे. अनेक जण शस्त्रक्रिये पर्यंत जाऊन पोहोचतात परंतु या अभ्यासाद्वारे शारीरिक संतुलन राखण्यासाठी डॉ स्वाती शेळके-पाटील यांनी विशेष परिश्रम केले आहे.एक ते दोन महिन्यांमध्ये अनेक महिलांचे चार ते पाच किलो वजन कमी झाले आहे.त्यांचे आयुष्य आरोग्याच्या दृष्टीने सुरळीत झाले आहे.डॉ स्वाती यांचे माहेरचे नाव डॉ स्वाती बसवंतराव पाटील(अँड) यांचा विवाह डॉ संजय प्रल्हादराव शेळके यांच्याशी झाला.शेळके हे थायराइड आजाराचे स्पेशालिस्ट आहेत.त्यांचे शालेय शिक्षण देशी केंद्र लातुर येथे झालेले आहे. महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी बी एच एम एस पदवी घेतली अभ्यास केला त्यांच्या प्रत्येक निर्णयाला आई-वडिलांनी पाठिंबा दिला.पती डॉ संजय शेळके यांनी सतत प्रोत्साहन दिले.बहन ज्योती पाटील हिचे मार्गदर्शन मिळाले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी सायाशा संजय शेळके तिच्याकडून मला सदैव ऊर्जा मिळाली अशी भावना डॉ स्वाती यांची आहे. पती संजय शेळके यांच्या थायरॉईड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या योगदान देतात.20 18 मध्ये त्यांना महिला दिनानिमित्त आदर्श महिला म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले.नोकरी असो की उद्योग-व्यवसाय त्यात यश अपयश राहतातच अशावेळी कष्ट घेऊन पुढे जाणे थांबू नये.ही त्यांची भूमिका योग्य अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी गर्भ संस्कार वर्गही त्याने घेतली आहे.संतुलित आहार आणि आजपर्यंत तीस बॅचेस झाले आहेत. नियमितपणे हे वर्ग सुरू राहतात ऑनलाईन सुद्धा योगाभ्यास घेतात योगामुळे वजन कमी करणे. याबरोबरच वजन वाढविणे आणि शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी यश मिळते. अशा त्यांच्या विश्वास आहे तर रोजच्या धावपळीमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही स्वतःकडे लक्ष देता येत नाही.त्यामुळे फेस योगा हा पर्याय नाही दिला आहे.आपले काम असेच पुढे सुरू ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीनेही याच दिशेने पुढे जाणे अशी त्यांची इच्छा आहे.
पुढील काळात महिलांच्या आरोग्यासाठी काम करायचे आहे.महिलासाठी जिम सुरू करायची आहे.सौंदर्य आणि शारीरिक सक्षमीकरण होण्याबरोबरच मानसिक सफलता मिळाली पाहिजे यासाठी उपक्रम घ्यायचे आहेत.वजन कमी करणे वाढविणे संतुलित आहार गर्भवती महिलांना मार्गदर्शन गर्भसंस्कार ही समग्र सेवा एकत्रित घेता येईल असेही डॉ स्वाती यांनी त्यांचे स्वप्न आणि मानस व्यक्त केला आहे.लोकमतच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व वुमन अचिव्हर्स ऑफ लातूर 20 21 बुकचे प्रकाशन सोहळा हॉटेल कार्निवल रिसॉर्ट मध्ये झाला यावेळी डॉ स्वाती शेळके-पाटील यांचा गौरव बुधवार दि 8 सप्टेंबर 2021 रोजी लातुरात हॉटेल कार्णीवल येथे करण्यात आला.
मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निखिल पिंगळे,सिने अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लोगो प्रायोजक वैशाली देशमुख(वाई),विजय केंद्रे(राजभोग आटा) यांचा सत्कार करण्यात आला.कोव्हिड-19 नियमांचे पालन करीत केवळ निमंत्रितांना होता यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 42 कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.