हौसेला मोल नसते बैलपोळया दिवशी बक-याची काढली मिरवणूक

 हौसेला मोल नसते बैलपोळया दिवशी बक-याची काढली मिरवणूक







औसा प्रतिनिधी  

बेलकुंड -औसा तालुक्यात आज सर्वत्र बैल पोळा उत्सवात साजरा करण्यात आला परंतु आज बेलकुंड मध्ये मैनुद्दीन बाशुमिया पठाण यांनी आपल्या बकऱ्याला मोठे मोठे फुगे लावून शिंगाला रंग लावून गावामध्ये हनुमान मंदिर समोर फिरवून हालकि वाजवून डान्स केला बकऱ्यासमोर डान्स पाहून सर्व लोकांना नवलच वाटले परंतू मैनुद्दीन पठाण यांनी सांगितले की वर्षभर मी शेळ्या राखण्याच काम करतो. शेळ्या व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहे व्यवसायामुळे माझ्या घराची प्रगती झाली सुख समाधानाने मी जीवन जगत आहे. वर्षभर शेळ्या राखल्यामुळे मी एक दिवस शेळ्या ला घेवून मिरवणूक काढावी हि माझी इच्छा होती हौस मोज करायला काहि सणानाचे निमित्त लागते हे मैनुद्दीन ने बेलकुंडकरांत दाखवून दिले. कोरोना महामारीमुळे  गेल्या वर्षी पासुन संपूर्ण सणउत्सव उत्सवात साजरा करण्यात आले नव्हते परंतू आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे म्हणून नागरिक कोणतेही सण उत्सवात साजरे करताना दिसत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या