राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडीतील सर्व सेवा लाभार्थ्यापर्यंत पोहचवा - राहुल केंद्रे यांचे निर्देश*

 *राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडीतील सर्व सेवा लाभार्थ्यापर्यंत पोहचवा - राहुल केंद्रे यांचे निर्देश*











*“राष्‍ट्रीय पोषण महिना”अभियान कार्यक्रमाचा उद्घाटन*

प्रतिनिधी लातूर जिल्हा राहुल शिवणे

रेणापूर तालूक्यातील खरोळा येथे दि.02.09.2021 रोजी मा.पंतप्रधाच्या संकल्पनेतील सुपोषित भारत ( कुपोषण मुक्त भारत) राष्ट्रीय पोषण महिना या अभियान कार्यक्रमाचे उद्धाटन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करम्यात आले यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,महिला व बाल कल्याण सभापती ज्योतीताई राठोड,कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याम सभापती रोहिदास वाघमारे, जि.प.सदस्य गोडभरले उपस्थित होते 


उद्घाटन प्रसंगी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले अंगणवाडी कार्यकर्ती व मतनीसांनी कोरोना काळात केलेले कार्य अतूलनीय व कौतूकास्पद असून पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतील कुपोषण मुक्त भारत करण्यासाठीही आपली भूमिका महत्वाची असणार असल्याचे सांगत गर्भवती महिलांसाठीही पोषण आहाराबाबत सजग राहून अॅनिमिया मुक्त भारताच्या अनुषंगाने गर्भवती महिलांसाठी अॅनिमियाबाबत योग्य मार्गदर्शन करावे  तसेच 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके ,गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्य तपासणीसाठीही अंगणवाडी कार्यकर्तीनी प्रयत्नरत रहावे असे मत मांडले 

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या  संकल्‍पनेती सुपोषित भारत  ( कुपोषण मुक्त भारत) शासनाच्‍या विविध विभागामध्‍ये अभिसरन पध्‍दतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर दि. ०१ सप्‍टेंबर, २०२१ ते दि. ३० सप्‍टेंबर, २०२१ या कालावधीत विविध उपक्रमांसह “राष्‍ट्रीय पोषण महिना” (Poshan Maah)  राबविण्‍यात येत आहे. पोषण अभियान कार्यक्रमाध्‍ये समाजाचा सक्रिय सहभाग असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. चालू वर्षी दि. ०१ सप्‍टेंबर, २०२१ ते दि. ३० सप्‍टेंबर, २०२१ हा संपूर्ण महिना “राष्‍ट्रीय पोषण महिना” (Poshan Maah) हा जन अंदोल  म्‍हणून जिल्‍हा स्‍तर, बाल विकास प्रकल्‍पामध्‍ये व अंगणवाडी स्‍तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करुन साजरा करावयाचा आहे.अंगणवाडीतील सर्व सेवा लाभार्थ्‍यांच्‍या घरापर्यंत पोचविता येतील. 

 कार्यक्रमाचे प्रस्‍तावीक श्री गिरी उप मु.का.अ. यांनी केले. सभापती महिला व बाल कल्‍याण जि.प. लातूर सौ. ज्‍योतीताई बापुराव राठोड यांनी पोषण महा बाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले, मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी पोषणमहा व डिजीटल अंगणवाडी, गरोदर स्‍त्रीया व स्‍तनदा माता यांचे कोव्‍हीड -१९ लसीकरण १००% करणे बाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. मा. जिल्‍हाधिकारी महोदय यांनी मातृत्‍व योजना, जेष्‍ट नागरीक सर्व्‍हे व पोषण विषयक मार्गदर्शन केले. मा. अध्‍यक्ष यांनी पोषणमहा, डिजीटल अंगणवाडी, १००% लसीकरण, आपली अंगणवाडी स्‍मार्ट अंगणवाडी “हॅपीहोम”, धडकमोहिमेंतर्गत १००% आरोग्‍य तपासणी करुन SAM व MAM बालके शोधुन त्‍यावर योग्‍य उपचार करणे, या बाबीवर सविस्‍तर मार्गदर्शन केले. तसेच पोषणमहा साजरा करत असताना कोविड-१९ च्‍या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे पालन करुन सर्व जनमानसामध्‍ये जनजागृती व प्रचार करणे बाबत सुचति केले. सदर कार्यक्रमास गविअ श्री अभंगे, बाविप्रअ सौ. क्षीरसागर, सर्व पर्यवेक्षीका, विस्तार अधिकारी ( सां) व सर्व अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस यांचे सहकार्याने पार पडला. शेवटी श्री बंडगर बी.एम. बाविप्रअ यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या