*दादा लवकर शाळा सुरू करा, विद्यार्थ्यांची सजंय दुधगावकर यांच्याकडे मागणी*
दि. 3 - उस्मानाबाद -
कळंब तालुक्यातील गौर येथे नुकतीच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी भेट दिली. यावेळी येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ येत दादा लवकरात लवकर शाळा सुरु करा, अशी हाक देत एकच टाहो केला.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर हे ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेटभेटी देत आहेत. त्यानुसार ते गौर येथे गेले होते. यावेळी येथील शालेय विद्यार्थ्यांनी दुधगावकर दादा आले दुधगावकर दादा आले, असे म्हणत यांच्याकडे धाव घेऊन दादा लवकरात लवकर शाळा सुरू करा. आम्हाला घरी करमत नाही. आमचा अभ्यासाचे नुकसान होत आहे. आम्ही सर्व कोरोना नियमांचे पालन करून शिक्षण घेऊ. परंतु शिक्षण चालू करा अशाप्रकारे मागणी विद्यार्थ्यांनी दुधगावकर यांच्याकडे केली. यावेळी विद्यार्थ्यांनी दुधगावकर यांचे राष्ट्रवादी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वह्या भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शालेय शिक्षक, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.