अभियंत्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करणार- आमदार अभिमन्यू पवार
लातूरच्या विकासात अभियंत्यांचा सिंहाचा वाटा - आयुक्त अमन मित्तल
लातूर (प्रतिनिधी ) भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १६० व्या जयंती निमित्त जागतिक अभियंता दिन मोठ्या उत्साहात भारत बर साजरा केला गेला . लातूर येथील असोसिएशन ऑफ कॅन्सल्टिंग इंजिनिअर्स आर्किटेक्ट या संघटनेच्या वतीने हॉटेल एम्बॅसि येथे अभियंत्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून बोलताना आमदार अभिमन्यु पवार म्हणाले की,देशाच्या जडण-घडणी मध्ये अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षणासारखाच अभियंतांचाही लातूर पॅटर्न जगासमोर आला आला पाहिजे.कृषी विषयापीठाच्या धरतीवर अभियंत्यांसाठी स्वतंत्र अभियंता विद्यापीठ निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
लातूरच्या विकासात व सौंदर्यात अभियंत्याचा सिंहाचा वाटा आहे. लातूर शहराच्या स्वच्छतेसाठी चौक सुशोभीकरण व जल पुनर्भरण आदी सामाजिक कामात अभियंता संघटनेचा महत्वाचा वाटा राहिला आहे. याहीपुढे संघटनेच्या माध्यमातून नवनवीन सामजिक उपक्रम राबवले जावेत.अशा उपक्रमांना योग्य ते सहकार्य महापालीके कडून केले जाईल अशी भावना यावेळी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर नगर रचनाकार विभागाचे सहसंचालक सुनिल मिटकरी श्री ओम स्टील चे प्रतिनिधी वल्लभ पारतकर संघटनेचे अध्यक्ष अभिजित सरसंबेकर.डॉ.धर्मवीर भारती, आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता डॉ. धर्मवीर भारती यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संघटनेची गेली अनेक वर्षापासूनची वाटचाल, संघटनेचे ध्येय उद्दिष्ट या बद्दलची माहिती दिली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते .नगर रचनाकार श्रीमती निकिता भांगे , ज्येष्ठ अभियंता गोपाळ शिंदे आदी अभियंत्या चा सन्मान करण्यात आला. तसेच युवा व युवती अभियंत्याचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी यांनी केले तर आभार अरिहंत जंगमे यांनी मानले. हा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी संघटनेची विनोद उदगीरकर, वसीम शेख, अमोल सेलुकर, अरिहंत जंगले, नितीन मांडाले, सुनिल देशमुख, मनोज देशमुख, नागनाथ गित्ते ,वामन पाटील, शाम संगमकर ,अहमद मुल्ला, सहदेव सर, सुषमा थोरात ,रोहिणी गिरी आदींनी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाने सांगता करण्यात आली..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.