आझादमध्ये राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त एकदिवसीय परिसंवाद संपन्न
औसा - येथील आझाद महाविद्यालयात १४ सप्टेंबर या राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त "देश_ विदेश में हिंदी भाषा की स्थिती"या विषयावर मंगळवारी आयोजित परिसंवाद यशस्वी संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ.अल्लाबक्ष जमादार (भाई किशनराव देशमुख महा . चाकुर) व डॉ.प्रवीण कांबळे ( हिंदी विभागप्रमुख श्री कुमारस्वामी महा.औसा)तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार हे उपस्थित होते. यावेळी प्रा डॉ. जमादार यांनी आपल्या भाषणात देश विदेशात हिंदी विषयाची वाढती लोकप्रियता, तसेच हिंदी भाषेतील असणाऱ्या साहित्याविषयी माहिती उपस्थितीताना दिली. तर प्रा डॉ. कांबळे यांनी हिंदी भाषेचे वैश्विक स्वरूप यावर भाष्य केले. प्राचार्य डॉ. मासूमदार यांनी आपल्या भाषणात हिंदी भाषेतील असणाऱ्या संधी याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य टी.ए जहागीरदार यांनी हिंदी भाषेसमोर भविष्यात असणारी संकटे वअडचणी सर्वांना अवगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मजहर कोतवाल यांनी तर आभार प्रा. महेबुब मंगरुळे यांनी केले. कार्य क्रमास प्राध्यापक व कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.