GST संम्बधी काय होणार स्वस्त आणि महाग ! संम्पन झाली जीएसटी कौन्सिलची 45 वीं बैठक

 *GST संम्बधी काय होणार स्वस्त आणि महाग ! संम्पन झाली जीएसटी कौन्सिलची 45 वि बैठक* 




 *अल्ताफ शेख  प्रतिनिधि/ उ,बाद




  जीएसटी कौन्सिलची 45 वि बैठक आज संपन्न झाली - यामध्ये स्विगी, झोमॅटो वर 5 टक्के GST लागू होईल 


* त्याचबरोबर कार्बोनेटेड फळ पेय आणि ज्यूसवर 28 टक्के + 12 टक्के जीएसटी आकारला जाईल - तसेच नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील 

  *पहा कोणत्या वस्तू होणार स्वस्त*

** वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 44 व्या बैठकीत काळ्या बुरशीच्या औषधांवरील कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला


* तसेच कोरोनाशी संबंधित औषधे आणि रुग्णवाहिकाचे दर कमी करण्यात आले - तर कोविडच्या लसीवर 5% जीएसटी सुरू राहील तसेच कोरोना संबंधित औषधांवर जीएसटी सूट 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालू राहील 

याचबरोबर बायोडिझेलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे 

*यावस्तूवरचे कर होणार कमी*  


*ऑक्सिमीटर वरील कर 12% वरून 5% करण्यात आला 


*हँड सॅनिटायझ 18% वरून 5% करण्यात आले 


*व्हेंटिलेटरवरील कर 12% वरून 5% पर्यंत करण्यात आला 


* रेमडेसिविर 12% वरून 5% करण्यात आले 


*वैद्यकिय ग्रेड ऑक्सिजन 12% ते 5% पर्यंत कमी करण्यात आले 


*पल्स ऑक्सीमीटरवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे


*ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरवरील कर 12% वरून 5% केला आहे

इलेक्ट्रिक फर्नेसेसवरील कर 12% वरून 5% केला आहे

 तापमान मोजण्याच्या साधनांवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे


 हेपरिन औषधावरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.

कोविड चाचणी किटवरील कर 12% वरून  5% करण्यात आला  

दरम्यान लोह, तांबे, आणि अँल्युमिनियम वरील जीएसटी वाढवण्यात आली आहे

 *वस्तू आणि सेवा* - करामध्ये झालेले बदल आपल्यासाठी ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या