*ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्य सुधारले पाहिजे -गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ*
*बेलकुंड ग्रामपंचायत ने केले दोन वर्गमित्राचा सत्कार*
औसा प्रतिनिधी :-
बेलकुंड चे सुपुत्र मयूर उत्तम कांबळे , औश्याचे गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे दोन वर्गमित्र एकाच शाळेत शिकत होते. दोन्हीही मित्राचा सत्कार करायचा असे ग्रामपंचायत बेलकुंडने ठरवले. सत्काराचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा की, चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पदावर अधिकारी झाले याचा सर्वानी आदर्श घ्यावा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ असे म्हणाले की ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य सुधारले पाहिजे. चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. घरातील एक नोकरदार झाला तर घर सुधारू शकतो. यशवंतराव रमाईचे घरकुल भरपूर प्रमाणात निधी आला आहे. ग्रामपंचायत ने पंचायत समितीला प्रस्ताव दाखल करावा. पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल (ड). हे एक महिन्यात येणार आहे. यशवंतराव योजनेतून बेलकुंड गावाला पंधरा नागरिकांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जास्तीत जास्त यशवंत मध्ये नावे देऊन प्रस्ताव मंजूर करून घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी यांच्याकडून करण्यात आले. गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ बेलकुंड गावचे सुपुत्र मयूर उत्तम कांबळे (सहाय्यक कार्यकारी अभियंता, सिडको, नवी मुंबई) या दोघांचे ग्रामपंचायतच्या वतीने शाल, पुष्पहार, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ गोविंद वाघमारे यांनी केले आहे. त्यावेळी सरपंच विष्णु कोळी, सोमनाथ कांबळे, प्रविण कांबळे, नागेश अपसिंगेकर, हणमंत कांबळे, पत्रकार विलास तपासे, उमेश कुलकर्णी, लखन रसाळ, मंगेश कणकधर, सचिन साळुंके आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.