*बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून अटक. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे गांधीचौक हद्दीतील गंज गोलाई, परिसरात दिनांक 10/10/ 2024 रोजी रात्री आरोपी सुलतान गफार कुरेशी राहणार, शहावली मोहल्ला, लातूर याने त्याच्या ओळखीचा व मित्र असलेला पैगंबर हाजीमलंग सय्यद,वय 28 वर्ष, राहणार बाभळगाव,(सध्या राहणार अंजली नगर.) लातूर याचे सोबत किरकोळ कारणावरून भांडण तक्रारी झाल्याने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने, गळ्यावर मारून खून केल्याची घटना घडली होती.
मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 653/ 2024 कलम 103(1)भारतीय न्याय संहिता प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास गांधी चौक पोलीस करीत होते. गुन्हा घडल्यापासून आरोपी सुलतान कुरेशी हा फरार होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केले होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील फरार आरोपी सुलतान कुरेशी याचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान पथकाकडून तो वास्तव्य करण्याची शक्यता असलेले ठिकाणे हैदराबाद, बिदर, सोलापूर, उदगीर, बीड येथे जाऊन नमूद आरोपीचा शोध घेण्यात येत होता. तसेच मोठ्या प्रमाणात गोपनीय माहिती मिळवून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत होता. परंतु सुलतान कुरेशी हा कोणत्याही नातेवाईकांच्या संपर्कात नसल्याने त्याच्या शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. तो दारू व नशापाणी करण्याच्या सवयीच्या असल्याने त्याला त्याच्या घरातून हाकलून दिले होते. तो इतरत्र कोठेही राहून मिळेल ते काम करून उपजीविका भागवीत होता.
तरीपण पथकातील पोलिसांनी सुलतान कुरेशीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस करून, तसेच गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी सोलापूर व कर्नाटक राज्याच्या सीमावर्त्ती भागामध्ये लपून वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पथकातील पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे जमीर शेख यांचे पथक तात्काळ सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील एका छोट्याशा गावात पोहोचून माहितीची शहनिशा करून गावात सापळा लावून अतिशय सीताफिने नमूद गुन्ह्यातील फरार आरोपीला दिनांक 22/12/2024 रोजी दुपारी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कऱ्हे हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे पोलीस अमलदार गणेश साठे, संतोष देवडे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.