आज पासून सुरु होणाऱ्या ५० एकरात 'इज्तेमा'ची निलंगा येथे सुरुवात
निलंगा(प्रतिनिधी )
आज ३० आणि उद्या ३१ डिसेंबर रोजी निलंगा शहरातील ईदगाह मैदान शेजारी लातूर रोड परिसरात होत असलेल्या जिल्हास्तरीय 'इज्तेमा'ची जय्यत तयारी करण्यात आली असून, ५० एकरांवर भव्य दिव्य इज्तेमा होत असल्याची माहिती अमीर हाजी अन्सार सहाब यांनी दिली आहे.
गेल्या एक महिन्यापासून इज्तेमाची दोनशे स्वयंसेवकांकडून रात्रं-दिवस मेहनत करण्यात आली . aaj👍🏻सोमवार व उद्या मंगळवार असे
दोन दिवस होणाऱ्या इज्तेमात धर्मगुरुंकडून मार्गदर्शन होणार आहे. निलंगा-लातूर रस्त्यावर नया ईदगाह परिसरात असलेल्या ५० एकरांवर इज्तेमा होणार आहे. भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. ध्वनीक्षेपक, लाईट, जनरेटर, पिण्याच्या पाण्याचे १२०० नळ, वजूखाने, ५०० स्वच्छतागृहे, स्नानगृहांची उभारणी, पाण्यासाठी टैंक उभारण्यात आले आहेत.
शिवाय १८ टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. इज्तेमा परिसरात १४ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मोफत चहाची
व्यवस्था करण्यात आली. ६ ठिकाणी भोजनगृह उभारण्यात आले आहेत. चहा, नाश्त्यासाठी २०० हॉटेल्सचे स्टॉल राहणार आहेत. प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय ही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. निलंगा येथे हा इजतेमा जवळपास १४ वर्षांनंतर होत आहे. या इज्तेमासाठी लातूर सह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत . उद्या ३१ रोजी रात्री दुवा होऊन इजतेमाचा समारोप होईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.