गुऱ्हाळ येथील वयोवृद्ध महिलेच्या खुनातील आरोपीस पोलीस ठाणे निलंगा कडून अटक

   *गुऱ्हाळ येथील वयोवृद्ध महिलेच्या खुनातील आरोपीस पोलीस ठाणे निलंगा  कडून अटक.*






लातूर 

               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 06/10/2021 रोजी निलंगा पोलीस ठाणे येथे गुऱ्हाळ तालुका निलंगा या ठिकाणी 80 वर्षीय वयोवृद्ध महिलाचा दुपारी दोन  वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये शेतीकाम करण्याकरता गेली असता त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने चाकूने त्यांचा गळा कापून खून केला असल्याची माहिती पोलीस स्टेशन निलंगा यांना प्राप्त झाली.

                  त्यानंतर घटनास्थळी  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉ दिनेश कुमार कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

                    मयताचे मुलाचे फिर्याद वरून पोलीस स्टेशन निलंगा गुन्हा रजिस्टर नंबर 286/21 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

              नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध डॉगस्कॉड ,फिंगरप्रिंट ,स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन चे तीन  पथक आरोपीचा शोध घेणे कामी व गोपनीय माहिती काढणे कामे रवाना केले. 

           आज दिनांक 09/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संदीप आनंदा भोसले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. आर्थिक विवेचनातून व पैशाची गरज असल्याने गावातील वयोवृद्ध महिलावर लक्ष ठेवून शेतात एकटी असतांना धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तिच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोत घेऊन गेला. असे निष्पन्न होत असल्याने सदर आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे.

         सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात व निलंगा अधिकारी उपविभागीय आधिकारी डॉ दिनेश कुमार कोल्हे यांचे नेतृत्वात  पोलीस निरीक्षक शेजाळ ,सपोनि कुदळे ,पोलीस उप निरीक्षक राठोड, अक्कमवाड , मुळीक, गर्जे, महिला पोलीस उप निरीक्षक गायकवाड  तसेच पोलीस स्टेशन चे अंमलदार सफौ शेंडगे, बानाटेे,बेग,सूर्यवंशी,चव्हाण, मजगे,सोमवंशी, माने, मुळे, बेबडे, नागमोडे, काळे भूतम्पल्ले व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री.सुधीर सूर्यवंशी,कोतवाड, राजू मस्के, माधव बिल्लापट्टे, नकुल पाटील, तसेच पोलीस ठाणे सायबर चे सपोनि श्री. सुरज गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश कंचे,गणेश साठे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील RCP नंबर 01 चे पोलिस जवान यांनी परिश्रम घेतले .

           सदर गुन्हयाचा पुढील तपास निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेजाळ करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या