*सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व- तिप्पणप्पा(दादा) राचट्टे.*

 *सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व- तिप्पणप्पा(दादा) राचट्टे.*





दैनिक मनोगतचे पितामाह,मनोगत प्रतिष्ठान चे अध्यक्ष,मार्गदर्शक आदरणीय तिप्पणप्पा(दादा) राचट्टे यांचा 6 ऑक्टोबर ला वाढदिवस होता.दादा विषयी चार शब्द लिहावं ऐवढा मी मोठा नाही,परंतु दादांचा माझ्या विषयी आणि माझ्या लेखणी विषयी असलेल्या प्रेमाखातीर दादांवर चार शब्द लिहायचं छोटासा प्रयत्न.दादा हे स्वभावाने सडेतोड, निर्भिड, रोखठोक,वास्तववादी विचारांशी सहमत असलेले व्यक्तिमत्व.खरंतर दादांची वैचारिक क्षमता,बुध्दीचातुर्य आणि देहबोली हे अवलोकनीय बाजू आहेत.कोणत्याही विषयावर चर्चा करीत असताना दादांचे सकारात्मक विचार आणि नकारात्मक बाबीवर विश्‍लेषण हमखास असते.दादा तस कोणत्याही पक्षाशी बांधील नाहीत परंतु प्रत्येक राजकीय पक्षातील लोकांशी दादांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.दादांचा कल हा शेतीकडे जास्त असून सामाजिक कार्यात सुद्धा नेहमी दादा अग्रेसर असतात.तसेच दादा व्यापार यासोबत प्रतिष्ठित दैनिक मनोगत वृत्तपत्राचे सर्वेसर्वा आहेत.व्यापार व शेतीसोबत एखादं वृत्तपत्र चालविणं म्हणजे तारेवरची कसरत असते.वृत्तपत्र चालविताना विविध अडचणीचा सामना करावा लागतो हि सत्यता माहित असून सुध्दा दादांनी राजू पाटील सरांना सोबत घेऊन संयमाने आणि अखंड परीश्रमाने दै.मनोगतला शिखरावर नेहून पोहचविलं आहे.मनोगत प्रतिष्ठानच्या वतीने दादा दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवख्या कलाकारांना प्रोत्साहीत करत असतात तसेच प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गौरव पुरस्काराने सन्मानित करतात.दादांचा पहाडी आवाज आणि दादांची शरीरयष्टी बघून घाम फूटतो,परंतु दादा जेवढे वरून कडक स्वभावाचे दिसतात तेवढेच आतून सुद्धा हळवे मनाचे आणि मायाळू वृत्तीचे आहेत.दादा कडे वैयक्तिक राग,ईर्ष्या,जात,धर्म या गोष्टींना थारा नाही.ते सर्वांसोबत ऋणानूबंधनाने वागतात,समजून घेतात आणि मैत्रीपुर्ण संबंध जपतात हे खास वैशिष्ठय मी जवळून पाहिलेलं आहे.खरंतर सर्वच भाव-भावनांना एकत्र बांधून जिवनाच्या या सुंदर अशा वाटेवरती मित्राचे,आपुलकीचे तथा सांघिक भावनेचे नाते मात्र सदा-सर्वदा अबाधित टिकविण्याचं मोलाचं कार्य दादांनी मनोगतच्या आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे.माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…कांही चांगले,कांही वाईट,कांही कधीच लक्षात न राहणारे आणि कांही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले दादा तुम्ही एक..म्हणूनच,या वाढदिवसानिमित्त आपणास अनंत शुभेच्छा देतो आणि दूवा करतो की,आपणास उदंड आयुष्य लाभो....

*व्यक्तीविशेष....*

*अ‍ॅड.इकबाल रसूलसाब शेख*

*औसा/मो.9545253786*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या