मा. पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे, मा.सहा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम (चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि महेश गळगटे, पोउपनि शंकर मोरे व डी बी पथकातील पोह/547 फुलारी, पोह/748 शिंदे, पोना/60 सारुळे, पोना/ 1422 नामदास, पोना / 1475 कलकत्ते, पोशि/ 1835 नलवाड सर्व ने.पो. स्टे. विवेकानंद चौक, लातूर व पोना/ 45 संतोष देवडे, पोकॉ/ गणेश साठे दोघे ने. सायबर सेल, लातूर यांनी पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे दाखल मालाविषयी गुन्ह्यापैकी गेल्या तीन दिवसात पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी खालील प्रमाणे तीन घरफोड्या व एक चोरी उघडकीस आणून गेला माल नमुद आरोपीतां कडून हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केलेली आहे.
1. पो.स्टे.विवेकानंद चौक, लातूर गुरंन 414 / 2021 कलम 454,457,380 भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घरात लोखंडी कपाटातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सव्वा तोळ्याची गळ्यातील सोन्याची साखळी तसेच चांदीचे दागीने असे एकुण 1,44,990 /- रुपये मालाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली होती सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय-28 वर्षे रा.म्हाडा कॉलनी, लातूर यास दिनांक 03/10/2021 रोजी अटक करून नमुद आरोपीकडून गेले माला पैकी साडेतीन तोळे सोन्याचे गंठण कि. अं. 1,05,000 करण्यात आलेले आहे. जप्त
2. पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर गुरंन 330/2018 कलम 457,380 भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घरातील कपाटाचे लॉकर मधून एक तोळे सोन्याची चैन व रोक 2500/ रुपये असा एकुण 22,500/- रुपयेचा माल चोरून नेला होता. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय-28 वर्षे रा. म्हाडा कॉलनी, लातूर याचेकडून गेले माला पैकी 01 तोळे सोन्याची चेन कि. अं. 20,000/- जप्त करण्यात आलेली आहे
3. पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर गुरंन 543/ 2021 कलम 454,457,380 भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील दिड तोळा सोन्याचे मणी मंगळसुत्र, चांदीचे वीस तोळे वजनाची गणपतीची मुर्ती, रोख 10,000/- रुपये असा एकूण 62,000/- रुपयेचा माल व फिर्यादीचे घराचे बाजुला राहणारे प्रशांत शशिकांत कुलकर्णी यांचे घरातील लोखंडी कपाटातील चांदीचे पाच तोळ्याचा करंडा व रोख 9,000/- रुपये असा एकूण
10,750/- रुपये अशा प्रकारे फिर्यादी व साक्षीदार यांचे मिळुण एकुण 72,750/- रुपयेचा माल
अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेवरून गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय 28 वर्षे रा. म्हाडा कॉलनी, लातूर यास दिनांक 07/10/2021 रोजी अटक करून त्याचेकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी दिड तोळा सोन्याचे मणी मंगळसुत्र कि.अं. 45,000/- रुपये व एक चांदीचा पाच तोळ्याचा करंडा कि. अं. 1750 /- रुपये असा एकूण 46,750/- रुपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
4. पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर गुरंन 656/2021 कलम 379 भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी घरा समोरील एक सायकल कि. अं. 3000/- रुपयेची चोरुन नेली होती त्यामध्येी नामे छोटूसाब बशीरसाब सय्यद वय 41 वर्ष रा. हरंगुळ ता. जि. लातूर यास दिनांक 0 रोजी अटक करून नमुद आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल कि. अं.. ची जप्त करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.