औसा शहरातील समस्याची पाहणी करण्यासाठी वेळ द्यावे: एम आय एम पक्षाची मागणी

 औसा शहरातील समस्याची पाहणी करण्यासाठी वेळ द्यावे: एम आय एम पक्षाची मागणी













औसा प्रतिनिधी

औसा शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते, नाल्या घाणीचे साम्राज्य व इतर अपूर्ण असलेल्या सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी आपला वेळ देण्यात यावा जेणेकरून शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पुरवण्यात येतील असे एम आय एम पक्ष अवसा च्या वतीने व शहराच्या  नागरिकांच्या वतीने दिनांक 7  सप्टेंबर 2021 गुरुवार रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे शहरात अनेक ठिकाणी रखडलेली विकास कामे घाणीचे साम्राज्य पसरू डेंगू, मलेरिया सारखे आजारापासून नागरिक त्रस्त आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्ता व गल्लीबोळातील अडचणी निदर्शनास आणून द्यावयाचे आहेत. यापूर्वी आपणास या संदर्भात पत्रा नवीन निवेदन देण्यात आलेली होती परंतु आपण त्यावर कसलीच कारवाई केलेली नाही. तरी सदरील समस्याचे निराकरण करण्यासाठी तसेच शहरातील अप रोड ते जलाल शाही चौक, किल्ला मैदान ते सादात दर्गा, तहसील कार्यालय ते कुरेशी मस्जीद, लातूर वेस ते जामा मस्जीद तिसरा टप्पा तसेच शहराच्या लगत असलेला जुना रस्ता शहरात एक ही रास्ता शहरात येण्यासारखा नाही. याची वारंवार सूचना करूनही नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तरी आपला अमूल्य वेळ देऊन एमआयएम पक्षाची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी एम आय एम औसा प्रमुख इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या