अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी छावा संघटनेच्यावतीने जागरण गोंधळ
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यात सह संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद मूग ही सर्व खरीप पिके पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे .तसेच मागील वर्षी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची एफआरपी अद्याप मिळाली नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने नवरात्र महोत्सवाच्या सुरुवातीस अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलनाचा आयोजन आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पाहणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राजकीय नेते फक्त दौरे काढून शासकीय यंत्रणा कामाला लावत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच परंतु सर्वसामान्य जनतेच्या पैशावर राजकीय नेते दौरे काढून शासनाच्या तिजोरी वर डल्ला मारीत आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जादा रक्कम देऊन सोयाबीन खरेदी केले असून शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव घसरले आहेत. उत्पादन खर्च वाढलेला असताना शेतकरी शेतीमालाचे भाव कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव आणि उसाची एफआरपी त्वरित द्यावी. अन्यथा राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता फिरू देणार नाही असा इशारा अखिल भारतीय चावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी दिला. या पत्रकार परिषदेसाठी भगवान दादा माकणे, विष्णु कोळी, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, तुळशीदास साळुंके, दगडू बर्डे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.