देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत बस्वराज पाटील यांची भूमिका महत्त्वाची
औसा प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील देगलूर मुखेड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू असून या पोटनिवडणुकीमध्ये महा विकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून महा विकास आघाडीच्या वतीने जितेश अंतापूरकर यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी सूत्रबद्ध नियोजन करून ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे दिनांक 23 ऑक्टोबर रोजी खानापूर सर्कल मध्ये विविध ठिकाणी जाहीर सभा आयोजित केल्या असून या जाहीर सभेस मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खानापूर सर्कल मधील खानापूर वन्नाळी चैनपुर आणि ते गाव या गावांमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. होते या सभेस एचके पाटील कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी मतदारांना महा विकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री कथा पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी या निवडणुकीमध्ये प्रत्येक बुतची रचना केली असून जास्तीत जास्त मतदान महा विकास आघाडीच्या उमेदवारास मिळवून घेण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत माजी मंत्री बसवराज पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.