औसा येथे पारंपारीक आग्गी सोहळा

 औसा येथे पारंपारीक आग्गी सोहळा






औसा .. औसा येथे श्री विरभद्रेश्वर मंदिरात सामूहिक आग्गी सोहळा दिनांक 26/10/2021 मंगळवार रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आग्गी सोहळ्याचे पाचवे पिढीचे पुरंत श्री रामलिंग सातलिंग स्वामी यांनी केले आहे.



     औसा येथे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून परंपरे नुसार चाललेल्या सामूहिक आग्गी सोहळ्यास पाचव्या पीढिची परंपरा चालू आहे . याची सुरुवात ईरय्या स्वामी या पुरंत स्वामींनी केले. यांचा वसा पुढे कायम ठेवण्याचे काम मृगय्या स्वामी , बसय्या स्वामी , सातगिंगय्या स्वामी व सद्या रामलिंगय्या स्वामी हे करीत आहेत . या आग्ग्गी सोहळ्याच्या पालखीची मिरवणूक विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व समाज बांधव व भक्तगण रामलिंग स्वामी यांचे अधिपत्याखाली सायंकाळी सात वाजता श्री विरभद्रेश्वर मंदिराकडे निघणार आहे.


 


महाप्रसादाचे आवाहन

श्री विरभद्रेश्वरांच्या आग्गी सोहळ्यात प्रतीवर्षाप्रमाणे याहीवर्षी रामलिंग स्वामी यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाप्रसादाचा लाभ समाज बांधव व भक्तगणांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन रामलिंग स्वामी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या