धार्मिक क्षेत्रातील सक्षम व्यक्तिंनी राजकारणात आवश्य भाग घ्यावाः
लातूर / प्रतिनिधी- धार्मिक क्षेत्रातील संत महंतांनी सुद्धा राजकीय क्षेत्रात सहभागी होऊन राजकीय क्षेत्रास नीतीमत्तेचे आधिष्ठान मिळवून दिले तर अधिक योग्य होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व दैनिक यशवंतचे संस्थापक प्रा. श्री. बी. व्ही. मोतीपवळे यांनी केले.
येथील जगतद्गुरु विश्वराध्य जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने शिष्यवृत्ति वितरण समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी औसा हिरेमठ संस्थानचे शिवाचार्य १०८ पूज्य श्री. शांतवीर स्वामीजी होते. पुढे बोलतांना प्रा. श्री. मोतीपवळे म्हणाले जीवनात गुरुचे महत्त्व आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाने, सनिध्य लाभल्याने व त्यांच्या आशिर्वादाने अपणास समाधान मिळते. जीवन सार्थक होत असल्याचा आनंद मिळतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात परिवर्तन होते. गुरूंचा प्रभाव असतो त्याचेमुळे समाजात शुद्धीकरण होणे सुलभ होते म्हणून गुरुमहाराज संत महंतांनी सुद्धा राजकीय क्षेत्रात सहभाग नोंदविल्यास सामाजिक शुद्धीकरणा बरोबरच राजकीय क्षेत्रातहि शुद्धीकरणाची प्रक्रिया वेग धरेल.
शिष्य वृत्ति प्राप्त विद्यार्थ्यांनी त्यांचे पालकांनी शिष्यवृत्तिचा उपयोग योग्य पद्धतीने करून, आडचणीवर मात करून उच्चस्थान प्राप्त करण्याचे ध्येय गाठाचे असेहि आवाहन केले.
आशिर्वचन पर भाषणात पूज्य श्री. शांतवीर शिवाचार्य महाराजांनी संपत्तिचा संचय करतांना त्याच योग्य विनियोग व योग्य प्रसंगी दान देण्याची वृत्ति जोपासावी त्यामुळे स्वतः बरोबर इतराचे हि कल्याण होईल असे प्रतिपादन केले. प्रतिष्ठाणच्यावतीने गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तिचे चेक देण्यात आले. प्रास्तविक भाषणात प्रा. श्री. मन्मथप्पा पंचाक्षरी यांनकी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणारे कार्यक्रमाची माहिती सांगितली तर डॉ. श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या व पूज्य श्री. शांतवीर महाराजांचे अशिर्वादाने प्रतिष्ठानचे कार्य योग्य पद्धतीने कसे चालते याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन श्री. शिवकांत स्वामी व श्री. बसवंतप्पा भरडे यांनी केले व कार्यक्रमास सर्व श्री अँड. हामने, सुभाषप्पा मुक्ता भालचंद्र मानकरी, पुष्पराज खुब्बा, ऍड. उमेश पाटील, प्रा. श्री. पाटील, रामलिंगप्पा ठेसे, श्री. मरळे साहेब, श्री. गण्णाचार्य स्वामी, श्री. आंबुलगे, राजेश्वर डांगे, गुलाब पाटील, इंजिनियर श्री. हावण्णा, काशिनाथप्पा वांगजे, जगन्नाथकोळंबे, जितेंद्र स्वामी, प्रकाशप्पा दुलंगे, शिवप्पा पाटणकर इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. बी. व्ही. मोतीपवळे यांचे प्रतिपान

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.