इलियास चौधरी यांच्यासह शेकडो युवकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश
औसा प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी या पक्षाने संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते इलियास चौधरी यांच्यासह शेकडो युवकांनी येथील शासकीय विश्रामग्रह औसा येथे आयोजित बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरुळे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. इलियास चौधरी यांच्यासोबत औसा शहरातील वली शेख, रफिक कुरेशी, खलील चौधरी, दिपक वाघमारे, समीर शेख, यासीन शेख, आसिफ शेख ,गौस शेख ,बबलू शेख ,दीपक मेकरे या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाल्या निमित्त तालुका अध्यक्षांनी फेटा बांधून पुष्पहार देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये नव तरुणांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. इलियास चौधरी यांच्याकडे पक्षाची येणाऱ्या काळात लवकरच मोठी जबाबदारी येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून वंचित बहुजन आघाडी या सर्व निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याने राजकीय पक्षाचे धाबे दणाणले आहेत. यावेळी तालुका महासचिव तात्याराव वाघमारे, सुभाष भालेराव तालुका सचिव ,अडँ जयराज जाधव , प्रभाकर सोनवते , श्रावण कांबळे, सूर्यकांत उबाळे, गायकवाड मोहन ,अडँ गजेंद्र गिरी, गंगाधर अडसुळे, विलास तपासे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह तालुका अध्यक्ष शिवरुद्र वेरुळे यांनी औसा येथील शासकीय विश्रामगृहा पासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढून जल्लोष साजरा करून नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.