*लातूर पोलिसांची गेली एक वर्षातील कामगिरी*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार 13 ऑक्टोबर 2020 रोजी म्हणजेच बरोबर एक वर्षापूर्वी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घेतला. दरम्यानचे काळात लातूर पोलिसांनी पोलीस स्टेशन देवणी हद्दीतील हेळंब वलांडी येथील खुनाचा गुन्हा ,औसा येथील याकतपूर रोडवरील खून, पोलीस स्टेशन मुरुड हद्दीतील सावरगाव येथील निर्घृण खुनाचा गुन्हा , त्याचबरोबर किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वयोवृद्ध महिलांचा मर्डर यासोबतच निलंगा तालुक्यातील गुराळ गावि झालेला वृद्धेचा खून या सर्व संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आणि प्रथमदर्शनी अउघड असणारे हे सर्व गुन्हे अल्पकाळात उघडकीस आणून यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात लातूर पोलिसांना यश मिळाले आहे.
लातूर जिल्ह्यात घडलेल्या अहमदपूर आणि उदगीर येथील ट्रक चालकांच्या खुनाच्या गुन्ह्यातही तातडीने तपासाची चक्रे गतिमान करून हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे.
या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यात दरोड्याचे आणि जबरी चोरीचे 128 गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी 87 गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश मिळाले आहे. गुन्ह्यात गेलेल्या माला पैकी 40 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे
याच बरोबर एकूण 158 चोर्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून जवळपास 90 लाख 29000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये शस्त्रास्त्रे शोध मोहीम घेण्यात आली ज्यामध्ये चार अग्निशस्त्र सह( पिस्टल),चाकू सुरे आणि तलवारी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले असून या संबंधाने भारतीय हत्यार कायद्या अनुसार 22 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधात वारंवार मोहिमा राबविण्यात आल्या ज्यामध्ये मागील एक वर्षाच्या काळात अवैध दारू विक्रीवर छापे मारून 2309 गुन्हे नोंद करण्यात आले असून 1 कोटी 49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, यासोबतच अवैद्य जुगार मटका यावर धाडी मारून 686 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 कोटी 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर एनडीपीएस कायद्या अंतर्गत गांजा बाळगल्याच्या 9 केसेस करण्यात आल्या असून 60 लाख 34000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर धाडी मारून 62 केसेस करण्यात आल्या असून 2 कोटी 69 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणि अवैध धंद्यावर आळा घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मोटार वाहन कायद्याखाली एकूण 1 कोटी 48 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
covid-19 च्या दुसऱ्या लाटेत लातूर पोलिसांनी चांगल्या प्रकारे जनसेवा बजावली आहे विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांना रक्तदानासाठी उद्युक्त करण्यात आले विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा लातूर पोलिसांनी सहभाग नोंदवला जनतेसाठी 24 तास लातूर पोलिस रस्त्यावर उभे होते या कालावधी दरम्यान लातूर पोलीस दलातील काही सहकाऱ्यांचे दुःखद निधन झाले अशा परिस्थितीत देखील न डगमगता लातूर पोलिस अविरतपणे कार्य करत होते पोलीस दलातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोनाग्रस्त झाले असताना पोलिस अधीक्षकांनी covid-19 ग्रस्तांचे आणि त्यांच्या पोलीस कुटुंबीयांचे मनोबल उंचावण्याचे कार्य केले आणि या सर्वांना वैद्यकीय मदत वेळीच उपलब्ध करून दिली.
सायबर सेल अद्यावत करण्यात आला असून विविध प्रकारच्या गुन्ह्याची उकल करण्यात सायबर सेलचा महत्त्वाचा रोल असून नियमितपणे सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत असून काही बेकायदेशीर हालचाल दिसून आल्यास वेळीच या दृष्टीने कारवाई केली जात आहे, याचाच भाग म्हणून वेगवेगळ्या समाज माध्यमावर शस्त्रास्त्रासह फोटो पोस्ट करणाऱ्या इसमांना चेक करण्यात येत असून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात येत आहेत . याचबरोबर चुकीच्या आणि अक्षेपार्य पोस्ट टाकणाऱ्याच्या विरोधातही कारवाई केली जात आहे.
एक वर्षाचे कालावधीत एकूण 866 गुन्ह्यात माननीय न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण कन्वेक्शन रेट 53 टक्के आहे.
कामकाजाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला कम्प्युटर्स , प्रिंटर्स आणि मल्टी फंक्शनल प्रिंटर मशीन पुरविण्यात आल्या, तर अभिलेख कक्षासाठी कॉन्पॅक्टर्स पुरविण्यात आले . त्याचबरोबर पाठपुरावा करून डी पी डी सी मधून अठ्ठावीस बोलेरो गाड्या आणि 51 दुचाकी वाहने मिळाली आहेत याच बरोबर संपूर्ण जिल्हाभरात कुठल्याही घटनेची खबर मिळताक्षणि लवकरात लवकर पोचता यावे यासाठीची डायल 112 प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. असून एकूण437 पोलीस अंमलदारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात सौर ऊर्जा पॅनल बसविण्याचे काम सुरू आहे.
लातूर ग्रीन वृक्ष टीमच्या साह्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात समोरच्या मोकळ्या जागेत छोटेसे उद्यान बगीचा तयार करण्यात आला. तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथे कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी ""विसावा विश्रांती कक्ष"" अद्यावत करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.