एस टी अपघात बाप लेकाचा मृत्यू उजनी मोडावरील घटना

 एस टी अपघात बाप लेकाचा मृत्यू 

उजनी मोडावरील घटना 

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

एस टी चालकाच्या चुकीमुळे घडली घटना :

 दोनशे रुपयांच्या भत्त्यासाठी चालकाने घातली चुकीच्या साईड ने गाडी. 

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""










औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवी हॉटेल समोर दुपारी 2 सुमारास नांदेड - तालिकोट के ए 28.f  2454 या क्रमांकाची एस टी तालि कोट येथे जात असताना उजनी मोड येथे हॉटेल वर जेवण नाश्ता करण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावरून रोंग साईटने आली व उजनी येथून भातगळी कडे जाणार्‍या एम एच 25 झेड 4538 या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात ज्ञानेश्वर हनुमंत जगताप वय 30.

हनुमंत माणिक जगताप वय 70 रा भातगळी. तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद यांचा जागीच मृत्यू झाला 

ज्ञानेश्वर जगताप व हनुमंत जगताप पितापुत्र उजनी येथे उजनी येथे शेतातील औषध घेण्यासाठी आले होते ते परत आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला त्यात बापलेकांनचा जागीच मृत्यू झाला.

त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या.व भादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नातेवाईक यांनी शवविच्छेदन करण्यासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे 

त्यामुळे येथे हॉटेलमध्ये बासुंदीचा व जेवण करण्यासाठी अनेक वाहणे थांबतात 

कोणत्याही हॉटेलवर एस टी बस थांबल्यास  मोफत जेवण. बासुंदी पार्सल व चालकास 200 रुपये भत्ता दिला जातो त्यामुळे प्रत्येक एस टी बस चालक या लालची पोटी रोंग साईड गाडी घालतात 

असाच प्रकार उजनी मोड येथे घडला.


ज्ञानेश्वर जगताप यांचे 3 वर्षपूर्वी लग्न झाले आहे तो पुणे येथील कंपनी मध्ये काम करत होता लोकडाऊन झाल्यामुळे तो भातगळी गावात राहत होता व वडिलांना मदत म्हणून तो शेती करत असे त्याला 1 वर्षाची मुलगी आहे 

त्याच्या मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या