बाल संस्काराची सुरवात हॅपी होम अंगणवाडी च्या माध्यमातून -जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे
लातूर जिल्हा प्रतीनिधी राहुल शिवणे
जळकोट तालुक्यातील चाटेवाडी येथे महिलांच्या हस्ते अंगणवाडीचे भूमिपूजन संपन्न
ग्रामीण भागातील बालकांच्या बालसंस्कारची सुरवात अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते. आता लातूर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत *हॅपी होम अंगणवाड्या* उपक्रम राबवत असून याचाच भाग म्हणून जळकोट तालुक्यातील चाटेवाडी येथे अंगणवाडी चे भूमिपूजन गावातील सर्व महिलांच्या साक्षीने ज्येष्ठ महिला व सीडीपीओ यांच्या हस्ते करण्यात आले.
लातूर जिल्हा परिषदेमार्फत सर्व शाळां या बाला उपक्रमाअंतर्गत नवीन रूप घेत आहेत.आनंद दायी व शैक्षणिक वातावरण शाळेत तयार झाले असून मुले शाळेत रममान होणार आहेत.आपण सर्वांनी बाला उपक्रमात सहभागी व्हावे व आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन राहुल केंद्रे यांनी केले .यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,गट विकास अधिकारी गोस्वामी, पाणी पुरवठा अभियंता गर्जे,सोमेश्वर सोप्पा, तालुकाध्यक्ष अरविंद पाटील नगर अध्यक्ष कीशनराव धुलशेटे, चाटे मामा,भाऊराव कांबळे,सत्यवान पांडे,संजय मामा पाटील, बालू नलंडवार बबन मुदाळे, शिवा डावळे, संजय काका आतनुरे, आदींसह ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.