औसा तालुक्यातील दोन ठिकाणी अज्ञात लोकानी जाळली सोयाबीनची बनीम
माळकोंडजी येथे 8 एक्कर सोयाबीनची बनीम तर किनीथोट येथे 3 एक्कर सोयाबीनची बनीम जाळली शेतकर्यांचे अश्रू कोण पुसणार
औसा प्रतिनिधी विलास तपासे औसा तालुक्यात भरपूर पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टी झाली. सोयाबीनच्या पिकात गुडघ्या इतके पाणी साचले होते पाण्यात व चिकलात जाऊन सोयाबीनचे काढ काढून शेतामध्ये बनीम रचली अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सोयाबीनची भरडण्याची मशीन येऊ न शकल्यामुळे अनेक शेतकर्यांची बनीम शेतात राहिल्याने याचा फायदा घेऊन औसा तालुक्यातील दोन ठिकाणी अज्ञात व्यक्तीने बनीम पेटवून दिली अगोदरच शेतकरी मोठ्या संकटात आहे. आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत शेतकर्यांना मदत करायचे सोडून काही नीच वृत्तीचे लोक असे काम करू शकतात. नुकसान झालेले पंचनामे झाले पण जळालेल्या सोयाबीनला शासन दरबारी कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नाही तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.
परमेश्वर दिलीप विभुते माळकोंडजी यांची सोयाबीन ढीग जळुन खाक सदरील उत्पन्न १०० ते१५० कट्टे काही व्यक्तीनी पेटवून दिली आहे खूप वाईट घटना आहे
तसेच दुसरी घटना औसा तालुक्यातील किनीथोट येथील शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांनी शेतातील तीन एक्करवरील सोयाबीनची काढणी करून सोयाबीन बनीम शेतात रचून ठेवली होती. काल रात्री अज्ञात लोकांनी सोयाबीन पेटवून दिले आहे. यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नुकसानीचा पंचनामा तलाठी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
यावेळी डोळ्यासमोर उभे सोयाबीन जळत असताना अवघ्या खरिप हंगामातील मेहनत हातून गेलेल्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाने नुकसानीची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तीन एक्करवरील सोयाबीनची बनीम जळाल्याने शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांचे सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.