देवंग्रा येथे नवरात्र उत्सवाची स्थापना




देवंग्रा येथे नवरात्र उत्सवाची स्थापना 


औसा (प्रतिनिधी) दि.12 तालुक्यातील देवंग्रा येथे सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने या वर्षी प्रथमच शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देवीची मूर्ती स्थापना करण्यात आली. येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ यावर्षी करण्यात आला. सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते दादा कोपरे, राम कांबळे, रामभाऊ शिंदे, यांनी येथील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी दयानंद साठे, युवराज साठे, विकास साठे, ज्ञानेश्वर साठे, सुरेश कोतापुरे, श्रीमंत मोरे, बाबासाहेब कांबळे, तुकाराम साठे, ज्योतीराम माने, वामन साठे, शैलेश साठे, राहुल साठे, तेजस कांबळे, किरण साठे, बालाजी साठे, शिवाजी साठे मधुकर साठे, भागवत कांबळे, केदारनाथ साठे, विलास साठे,दिगंबर साठे, ज्ञानेश्वर साठे, आकाश साठे शिवाजी साठे,तानाजी साठे, निवृत्ती साठे, उद्धव कांबळे, प्रकाश कांबळे, परमेश्वर साठे, गुणवंत साठे, शुक्राचार्य मोरे, खंडू मोरे, बाबुराव मोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवीची आरती केल्यानंतर सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने उपस्थित ग्रामस्थ व सर्व महिलांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या