नवरात्र महोत्सवानिमित्त उजेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
औसा (प्रतिनिधी)दि.12
जय भवानी प्रतिष्ठान उजेड यांच्या विद्यमाने शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दिनांक 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती भवाळ यांच्या भारुडाचा जंगी कार्यक्रम आराधी, गोंधळी, यांच्या गीतांचा कार्यक्रम स्वर साधना संगीत रजनी ह. भ. प.पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचे किर्तन, त्याचबरोबर लिंबाजी विद्यालय येथे भव्य रांगोळी स्पर्धा होणार असुन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवदुर्गा महिलांचा सन्मान आणि देवीची छबिना मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र महोत्सवात करण्यात आले.
औसा येथील सामाजिक कार्यकर्ते दादा कोपरे, रामभाऊ शिंदे, राम कांबळे व श्रीमंत मोरे यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेऊन जय भवानी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रतिष्ठानचे भाऊसाहेब सगर, व्यंकट डांगे, काशिनाथ सगर , भागवत जाधव, नवनाथ गंगणे, लहू सूर्यवंशी, गुरुलिंग स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते.येथील नवरात्र महोत्सवाचा उत्सव साजरा करण्याचे हे 21 वे वर्ष असून उजेड येथील देवी भक्तांनी मागील दोन दशकांपासून ही परंपरा कायम ठेवली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.