*घुसखोर सुध्दा प्रकल्पाबाधित आहेत, दुसरी इमारत बांधून शिल्लक्कांना ताबा द्या. डॉ राजन माकणीकर*
*मुंबई दि (प्रतिनिधी) घुसखोर नाहीत तेही प्रकल्पबाधित आहेत त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यापेक्षा शिल्लक झोपडीधारकांना नवीन इमारत बांधून योजनेत सामावून घेण्याचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एमआयडीसी महामंडळाला दिले आहे.*
विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, प्रकल्पातील इमारतींमध्ये शेकडो घुसखोरांनी ताबा मिळवला असला तरी शासनाच्या बेजवाबदार पणामुळे बेघर आणि त्रस्त झालेल्या झोपडीधारकांना हे पाऊल उचलावे लागले आहे.
झोपडी तोडून देऊन आजही अ
शेकडो झोपडपट्टीधारक सदनिकेच्या प्रतीक्षेत जीवाच्या घटका मोजत आहेत. तर काहींनी इमारती मध्ये राहायला जाण्याच्या स्वप्नावरच आपली जीवन यात्रा संपवली आहे. किंबहुना आजहिं शासन व प्रशासनावर विश्वास ठेवून अनेक शेकडो कुटुंब व्यययलेल्या मांजरी सारखी भटकंती करत आहेत.
ज्यांना घुसखोर म्हणून संबोधिले जात आहे ते मूळझोपडी धारक आहेत, तर काहींनी मूळ झोपडीधारकांकडून खरेदी केलेली आहे. अंधेरी पूर्व विधानसभेचे विद्यमान लाडके शिवसेनेचे आमदार रमेश लटके अश्यांना सदनिकेतून हाकलून बेघर करण्याच्या प्रयत्नात असून रिपाई डेमोक्रॅटिक त्यांचे हे मनसुबे उधळून लावेल.
वर्ष 2000 च्या सर्व झोपडपट्ट्यांना पात्र घोषित करून संरक्षित करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश असून त्यानुसार महामंडळाच्या सहकार्याने नवीन इमारत बांधून त्या इमारती मध्ये शिल्लक प्रकल्पाबाधितांना स्थलांतरित करावे अशी सूचना प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पँथर डॉ. माकणीकर यांनी दिली आहे.
एकंदरीत कोणत्याही राजकीय सामाजिक संस्था संघटना किंवा पक्षाच्या प्रलोभणाला अथवा धमकी ला ना घाबरता प्रशासनाने प्रकल्प पूर्व करवून घ्यावा, एकही मूलझोपडी धारक सदनिके पासून वंचित राहिला नाही पाहिजे.
स्वार्था साठी कोणी राजिकिय नेते निर्णय घेण्यास कोणते बर्डन आणत असतील तर त्याची माहिती आम्हाला देण्यात यावी लोकशाही मारघाणे आंदोलनाचा पावित्रा घेऊन प्रकल्प-पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण करणाऱ्या त्या-नेत्यास आम्ही त्याची जागा दाखवून देऊ असाही इशारा यावेळी माकणीकर यांनी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.