महात्मा गांधी विचार मंचतर्फे औशात राष्ट्रपीत्यांना अभिवादन
औसा (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त औसा येथे महात्मा गांधी विचार मंचतर्फे भगीरथ पाटील यांच्या हस्ते आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश अप्पा ठेसे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रपीत्यांना औसेकरांनी विनम्र अभिवादन केले. येथील गांधी चौकात आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी विचार मंचतर्फे उपस्थितांना माझी "जीवनगाथा" हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. मागील २५ वर्षाची परंपरा कायम राखत औसा येथे दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यात येते. शनिवार दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विचार मंचचे समन्वयक सुनील उटगे, राम कांबळे, दादा कोपरे, शेख शकील, मुक्तेश्वर पडसलगे, सुशीलकुमार बाजपेयी, शेख हन्नान, दिगंबर माळी, मुजफ्फर अली इनामदार, दिलावर तत्तापूरे, अशोक देशमाने, पत्रकार काशिनाथ सगरे, आसिफ पटेल, शमशुल हक काझी, मुक्तार मणियार, नंदकुमार सरवदे, चंद्रशेखर पारुडकर, नंदकुमार देशपांडे, सुरेश स्वामी, इमामअली आळंदकर, ॲड विजयकुमार अश्टुरे,जयशेट्टे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.