राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त..........................
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औसा पंचायत समितीच्या मा.उपसभापती तथा विद्यमान सदस्या सौ,रेखाताई शिवकुमार नागराळे यांच्या वतीने कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देशावर कोसळलेल्या संकटकाळात समाजासाठी ज्यांच खूप मोठे योगदान लाभलं व ज्यांनी जीवाची परवा न करता ग्रामीण भागात रुग्णांसाठी देवदूत म्हणून जनतेची सेवा केली त्या मौजे टाका आणि बिरवली ता.औसा जि.लातूर येथील अंगणवाडीच्या एकूण 18 कार्यकर्त्या,मदतनीस व आशाताईंचा आज दि .2 ऑक्टोबर रोजी मौजे टाका येथे साडीचोळी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच वरीलपैकी गावात जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशास पात्र ठरलेल्या चार विद्यार्थ्यांसह त्यांच्या गुरुजनांचा देखील सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्यासह देशपातळीवर नावलौकिक मिळविलेल्या शैलेश शेळके,आकाश देशमुख,अभिषेक भीमाशंकर कुलकर्णी,यांच्याही पालकाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेल्या महीला बचतगटाच्या सदस्यांना महिलांना करता येण्यासारखे वेगवेगळे उद्योग,कर्जाविषयीची माहीती तसेच नवीन गट निर्माण करण्यासाठी मौजे शिवली येथे 16 ऑक्टोबर वार शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिर व महिला बचतगटाच्या महामेळाव्याची माहिती देण्यात आली.या सत्कार व गौरवसमारंभाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुजाता शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्यासह सरपंच बब्रुवान बंडगर,उपसरपंच अतुल शिंदे,चेअरमन गोरख सावंत, माजी सरपंच रामचंद्र शिंदे,बचतगटाच्या प्रभाग समन्वयक पूनम भोळे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर,सर्व शिक्षक,शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्य जिवन शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुशीला गिरी, तंटा मुक्तीचे अध्यक्ष ज्योतिबा गोरे,माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल लोखंडे, समाधान जोगी,दत्ता देवशिंगकर,समाधान गोरे,फुलचंद मोरे, सूर्यकांत तोळमारे, दत्तात्रय शिंदे, प्रकाश शिंदे, शेषेराव गोरे, दादा मोरे, संभाजी कांबळे, गुणवंत लोहार, विकास महावरकर, प्रदीप गोरे, रतन गिरी, वसंत धोत्रे, दादा भोई,राजाभाऊ शेळके, धनराज गिरी, राजेंद्र कांबळे, तानाजी गरड,युवराज हांडे इ..मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.