पोलीस मुख्यालय,बाभळगाव रोड,लातूर येथे पोलीसस्मृती दिन कार्यक्रम सम्पन्न
लातूर रिपोर्टर न्यूज़
*पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*
*प्रेस नोट*
*दिनांक :21/10/2021*
हिमालयातील पर्वत राईच्या बर्फाळ परदेशात भारत आणि तिबेट मधील 2500 मैलाची विस्तीर्ण सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी 1959 पर्यंत भारतीय पोलीस दलाकडे होती. सध्या ही जबाबदारी पार पाडत असलेले सीमा सुरक्षा दल त्या वेळेस अस्तित्वात नव्हते. सरहद्दीवर लडाख भागात 18 हजार फूट उंचीवर हॉट स्प्रिंग या ठिकाणी दिनांक 21/10/1959 या दिवशी तेथील पोलीस दलाच्या 10 शूर शिपायांच्या तुकडीवर पूर्ण तयारीने शत्रूकडून हल्ला करण्यात आला . त्यावेळी दहा शूर वीरांनी शत्रूंशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले.
तेव्हापासून 21 ऑक्टोंबर हा दिवस हा देशातील विविध पोलिस दलाच्या वतीने *पोलीस स्मृतिदिन* म्हणून पाळला जातो. पोलीसस्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागील एक वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण पत्कारले त्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
आज दिनांक 21/10/2021 रोजी सकाळी 08.00 वाजता पोलीस मुख्यालय,बाभळगाव रोड,लातूर येथे पोलीसस्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्रीमती सुरेखा कोसमकर जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर., मा.श्री. पृथ्वीराज बी.पी.,जिल्हाधिकारी लातूर., श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक लातूर,श्री.अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर., श्री.लक्ष्मण देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक लातूर.,श्री.सुधिर देशमुख अधिष्ठाता विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर.,श्री.अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक लातूर.,श्री. निकेतन कदम सहाय्यक पोलिस अधिक्षक,उपविभाग चाकुर.,श्री.जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर.,श्री.कामठेवाड,पोलीस उपअधीक्षक (गृह) लातूर, श्री.गजानन भातलवंडे- पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री.गणेश कदम पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे लातूर ग्रामीण, राखीव पोलीस निरीक्षक श्री गफार शेख पोलीस मुख्यालय लातूर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिनांक 01/09/2020 ते 31/08/ 2021 या कालावधीमध्ये देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे एकूण 377 पोलीस अधिकारी अंमलदार यांना आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. यावेळी शहीद पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या नावाचे वाचन श्री.निकेतन कदम, सहाय्यक पोलिस अधिक्षक,श्री.गणेश कदम पोलीस निरीक्षक यांनी केले. श्री. दिलीप माने राखीव पोलीस उप निरीक्षक,पोलीस मुख्यालय यांनी त्यांच्या पोलीस अमलदारसह शहिदांना शोक सलामी, मानवंदना दिली.यावेळी शहीद पोलीस अमलदार बळवंत शंकरराव भातलवंडे यांचे कुटुंबीय हजर होते.
सदर कार्यक्रमाचे ठिकाणी लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.