औसा येथे ईद-ए-मिलाद विविध उपक्रमांनी साजरी
औसा प्रतिनिधी
ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने अफसर शेख आणि जाफर पटेल युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कट घर गल्ली शादीखाना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त खा ओमप्रकाश निंबाळकर यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्षपदी औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख हे होते. ईद ए मिलाद निमित्त 61 तरुणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. तर नेत्र तपासणी शिबिरांमध्ये 204 नेत्र रुग्णांची तपासणी करून त्यांना चष्मा व इतर औषध उपचार देण्यात आले. तसेच रक्त तपासणी शिबिरांमध्ये सुमारे 225 जणांनी सहभाग घेऊन आपले रक्ततपासणी करून घेतली. मागील दीड वर्षापासून कोरडा विषाणूंचा प्रादुर्भाव असताना विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल युवा मंचच्या वतीने प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन खा निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, प्रभारी नगराध्यक्ष कीर्ती कांबळे, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख ,मेहराज शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील, माजी उपनगराध्यक्ष सय्यद खादर सुलेमान शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव ,भरत सूर्यवंशी,शेखर चव्हाण, जाफर पटेल ,वकील इनामदार व लिखा पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी खा ओम प्रकाश निंबाळकर यांनी अफसर शेख व जाफर पटेल युवा मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.