समजात तेढ़ निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सेंड करणाऱ्या 04 इसमावर लातूर पोलिसाकडून 03 गुन्हे दाखल.*

समजात तेढ़ निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सेंड करणाऱ्या 04 इसमावर लातूर पोलिसाकडून 03 गुन्हे दाखल.*






लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, त्रिपुरा व राज्यातील इतर जिल्ह्याच्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने काही इसम सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावा, सामाजिक शांतता बिघडावी या उद्देशाने जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज ,व्हिडिओ वायरल करीत असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलच्या निदर्शनास आले.

           त्यावरून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे निर्देशांन्वये व अपर पोलिस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला एकूण 04 इसमा विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक विवेकानंद चौक व उदगीर शहर येथे 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

            तसेच वर नमूद इसमांनी वायरल केलेल्या पोस्ट,मेसेजेस,व्हिडिओला प्रतिसाद देणारे, त्यावर प्रक्षोभक आणि हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणारे कमेंट करणारे सोशल मीडिया वापरकरर्त्या वरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. 

           कोणतीही परिस्थिती हाताळण्यास लातूर पोलिस पूर्णपणे सज्ज असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच सायबर सेलचे पथके तयार करण्यात आले असून त्यांचे मार्फत सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. 

       यापुढेही सोशल मीडिया वरून सामाजिक शांतता धोक्यात आणणारे, प्रक्षोभक आणि हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणारे मेसेजेस, व्हिडिओ वायरल केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

              *तसेच त्रिपुरा व राज्यातील काही जिल्ह्यात घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने लातूर पोलीसातर्फे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना, पक्ष, संघटनाना सामाजिक सलोखा राखण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पक्ष, संघटनांनी लातूर पोलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी आयोजित केलेले बंद व रास्ता रोको आंदोलन रद्द केले. त्यामुळेही सामाजिक शांतता राखण्यास त्यांचा हातभार लागला आहे. त्यामुळे लातूर पोलिसाकडून सदरच्या पक्ष,संघटनांचा लातूर पोलिस प्रशासनाने आभार व्यक्त केले आहे.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या